OP Chaudhary : IAS ते अर्थमंत्री! 23 व्या वर्षी कलेक्टर अन् सर्वात तरूण मिनिस्टर...

Rajanand More

ओम प्रकाश चौधरी

ओम प्रकाश चौधरी हे छत्तीसगढचे अर्थमंत्री आहेत. खेडेगावांत जन्म झालेल्या चौधरी यांचा IAS ते मंत्रिपदापर्यंतचा प्रवास अत्यंत प्रेरणादायी आहे.

OP Chaudhary | Sarkarnama

वडिलांचे निधन

छत्तीसगढमधील रायगढ जिल्ह्यातील बयांग हे चौधरींचे मुळ गाव. वडील सरकारी शाळेत शिक्षक होते. चौधरी हे आठ वर्षांचे असतानाच वडिलांचे निधन झाले.

OP Chaudhary | Sarkarnama

पेन्शनचा आधार

आईचे शिक्षण चौथीपर्यंत झाले होते. वडिलांच्या पेन्शनवर घर खर्च भागवावा लागत होता. त्यासाठी प्रशासनाकडे अनेक चकरा माराव्या लागल्या.

OP Chaudhary | Sarkarnama

कलेक्टर बनण्याचे स्वप्न

चौधरी हे 11 वर्षांचे असताना आईसोबत पेन्शनसाठी एकदा जिल्हाधिकाऱ्यांना भेटले. त्यावेळी त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना झापले. तेव्हा त्यांचा रुबाब पाहून कलेक्टर बनण्याचे ध्येय उराशी बाळगले.

OP Chaudhary | Sarkarnama

दंतेवाडामध्ये नियुक्ती

छत्तीसगढमधील सर्वाधिक नक्षलग्रस्त जिल्हा असलेल्या दंतेवाडाचे जिल्हाधिकारी म्हणून 2011 मध्ये नियुक्ती. त्यावेळी ते सोबत एके 47 घेऊन झोपायचे. खोलीबाहेर दोन जवानही असायचे.

OP Chaudhary | Sarkarnama

23 व्या वर्षी कलेक्टर

ओपी चौधरी बीएसएस्सी पदवी मिळवल्यानंतर यूपीएससीची तयारी सुरू केली. 2005 मध्ये ते आयएएस बनले. त्यावेळी त्यांचे वय केवळ 23 वर्षे होते. जिल्ह्यात त्यांनी अनेक उल्लेखनीय कामे केली.

OP Chaudhary | Sarkarnama

13 वर्षे कलेक्टर

ओम प्रकाश चौधरी यांनी 13 वर्षे कलेक्टर म्हणून काम केले. 2018 मध्ये त्यांनी सेवेचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला.

OP Chaudhary | Sarkarnama

पहिला पराभव

राजकारणात आल्यानंतर 2018 मध्ये त्यांनी खारसिया मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढली. पण त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

OP Chaudhary | Sarkarnama

विजय अन् मंत्री

2023 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र चौधरी यांनी रायगढमधून विजय मिळवला. एवढेच नाही तर त्यांना थेट अर्थमंत्री करण्यात आले. ते मंत्रिमंडळातील सर्वात तरूण मंत्री ठरले.

OP Chaudhary | Sarkarnama

NEXT : कॉन्स्टेबल ते IAS; आता सगळेच ठोकतात सॅल्युट, दीपक सिंह यांनी सक्सेस स्टोरी...

येथे क्लिक करा.