Rashmi Mane
आपल्या बाळाच्या भविष्यासाठी गुंतवणुकीचा विचार करताय? PPF (पब्लिक प्रॉव्हिडंट फंड) ठरू शकतो सर्वोत्तम पर्याय !
बाळाच्या नावावर PPF अकाउंट उघडून तुम्ही त्याच्यासाठी लाखोंचा फंड तयार करू शकता.
सध्या PPF स्कीमवर 7.1% वार्षिक व्याज मिळतंय. दीर्घकाळात हे पैसे मोठ्या रकमेत बदलतात.
जर एखाद्याला दोन मुले असतील तर एका अल्पवयीन मुलाचे पीपीएफ खाते आई आणि दुसऱ्याचे वडील उघडू शकतात.
मात्र आई-वडील एकाच मुलाच्या नावावर दोन वेगवेगळे PPF अकाउंट उघडू शकत नाहीत.
अल्पवयीन मुलाच्या PPF अकाउंटमध्ये किमान 500 रुपये आणि कमाल 1.5 लाख रुपये वार्षिक जमा करता येतात.
आई-वडिलांचे स्वतःचे PPF अकाउंट असले तरीही एकत्रित डिपॉझिट लिमिट 1.5 लाख रुपयेच राहील.
मुलं 18 वर्षांचा झाल्यावर तो स्वतःचं अकाउंट ऑपरेट करू शकतो.