पी. चिदंबरम यांच्या वक्तव्यामुळे चर्चेत आलेलं अन् इंदिरा गांधींच्या हत्येला कारणीभूत ठरलेलं 'ऑपरेशन ब्लू स्टार' नेमकं काय होतं?

Jagdish Patil

पी. चिदंबरम

माजी केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांच्या वक्तव्यामुळे इंदिरा गांधी पंतप्रधान असताना सुवर्ण मंदिरात झालेलं ऑपरेशन ब्लू स्टार पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.

P Chidambaram Controversy | Sarkarnama

किंमत

ऑपरेशन ब्लू स्टारची पद्धत चुकीची होती, ज्याची किंमत इंदिरा गांधींना त्यांचा जीव गमावून चुकवावी लागली, असं चिदंबरम यांनी म्हटलं आहे.

P Chidambaram Controversy | Sarkarnama

इंदिरा गांधी

मात्र, हे ऑपरेशन करण्याचा निर्णय पोलीस, गुप्तचर विभागाने मिळून घेतला होता. त्यामुळे यासाठी फक्त इंदिरा गांधींना दोष देता येणार नाही, असंही चिदंबरम म्हणाले.

P Chidambaram Controversy | Sarkarnama

भावना

दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुवर्ण मंदिरात बुटांसह सैन्य शिरल्यामुळे तिथे रक्ताचे सडे पडले. ज्यामुळे शिख धर्मियांच्या भावना दुखावल्या असंही ते म्हणाले.

Operation Blue Star | Sarkarnama

ऑपरेशन ब्लू स्टार

तर पी. चिदंबरम यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आणि इंदिरा गांधींच्या हत्येला कारणीभूत ठरलेलं ऑपरेशन ब्लू स्टार काय होतं? ते जाणून घेऊया.

Operation Blue Star | Sarkarnama

सुवर्ण मंदिर

ऑपरेशन ब्लू स्टारला 40 वर्षे झाली. पंजाबला वेगळा देश म्हणजेच खालिस्तान म्हणून मान्यता देण्याची मागणी करणारे अतिरेकी सुवर्ण मंदिरात तळ ठोकून बसले होते.

Operation Blue Star | Sarkarnama

भारतीय लष्कर

या अतिरेक्यांविरोधातील ऑपरेशन ब्लू स्टारची कारवाई जून 1984 मध्ये सुरू करण्यात आली. ज्यामध्ये भारतीय लष्कराच्या 83 सैनिकांचा मृत्यू आणि 248 सैनिक जखमी झाले.

Operation Blue Star | Sarkarnama

मृत्यू

तसंच 492 सामान्य लोकांचा मृत्यू झाला आणि 1,592 लोकांना अटक करण्यात आली. या घटनेमुळे संपूर्ण जगातील शीख धर्मियांच्या भावना दुखावल्या.

Operation Blue Star | Sarkarnama

हत्या

हे ऑपरेशन भारतीय सैन्याचा विजय, मात्र राजकीयदृष्ट्या पराभव होता. कारण तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींची हत्या त्यांच्या शीख अंगरक्षकांनी या ऑपरेशनच्या बदल्यात केली होती.

Operation Blue Star | Sarkarnama

NEXT : नोबेल पुरस्काराची सुरूवात कोणी आणि कधी केली? जाणून घ्या इतिहास

2025 Nobel Peace Prize
क्लिक करा