Aslam Shanedivan
पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी दहशत माजवत 26 पर्यटकांची हत्या केली होती.
ज्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरात घसून कारवाई केली होती.
भारतीय हवाई दलाच्या नऊ लढाऊ वैमानिकांनी ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानातील मुरिदके आणि बहावलपूर आणि पाकिस्तानी लष्कराच्या तळांवर अचूक हल्ला केला होता.
या कारवाईत भारतीय हवाई दलाने दहशतवाद्यांच्या 9 अड्ड्यांना लक्ष करत 100 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला होता.
यानंतर आता ही कामगिरी करणाऱ्या हवाई दलाच्या 9 लढाऊ वैमानिकांना लष्करातील प्रतिष्ठेचे वीर चक्र पदक जाहीर झाले आहे.
लष्करातील सर्वोच्च पदकांपैकी तिसऱ्या क्रमांकाचे असलेले वीर चक्र पदक भारतीय हवाई दलाच्या 9 लढाऊ वैमानिकांना जाहीर झाले आहे.
कॅप्टन रणजित सिंग सिधू, कॅप्टन मनीष अरोरा, कॅप्टन अनिमेश पाटणी, विंग कमांडर जॉय चंद्रा, कॅप्टन कुणाल कालरा
स्क्वाड्रन लीडर सार्थक कुमार, स्क्वाड्रन लीडर सिद्धांत सिंग, स्क्वाड्रन लीडर रिझवान मलिक, फ्लाईट लेफ्टनंट आर्शवीर सिंह ठाकूर