Rajanand More
ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळ उध्वस्त केल्यानंतर भारताने पाक लष्कराचे काही महत्वाचे लष्कळी तळही नेस्तनाबूत केले. यामध्ये त्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
भारतीय लष्कराच्या सैन्यदल, हवाई दल आणि नौदलाच्या या तिन्ही दलांनी आपली ताकद दाखवून देत पाकला चारी मुंड्या चीत केले. पाकने शस्त्रसंधीचा प्रस्ताव ठेवत माघार घेतली. तिन्ही दलांच्या ऑपरेशनचे नेतृत्व करणारे अधिकारी नायक ठरले आहेत.
भारतीय लष्कराचे डायरेक्टर जनरल ऑफ मिलिटरी ऑपरेशन्स म्हणजेच DGMO लेफ्टनंट जनरल राजीव घई यांच्या नेतृत्वात सैन्यदलाने कामगिरी फत्ते केली.
पाकिस्तानकडून सीमेवर झालेल्या हल्ल्यासह ड्रोन आणि मिसाईल हल्ल्याला सैन्यदलाने चोख प्रत्युत्तर दिले. पाकिस्तानचे सर्व हल्ले परतवून लावले.
डायरेक्टर जनरल ऑफ एअर ऑपरेशन्स म्हणजेच DGAO एअर मार्शल ए. के. भारती. त्यांच्या नेतृत्वाखाली दहशतवाद्यांचे पाकमधील नऊ तळ उध्वस्त करण्याची कामगिरी हवाई दलाने केली.
पाक लष्कराचे महत्वाचे एअर बेसही हवाई दलाने नेस्तनाबूत केले आहेत. त्यासाठी ड्रोन, मिसाईलचा वापर करण्यात आला.
डायरेक्टर जनरल ऑफ नेव्ही ऑपरेशन्स म्हणजेच DGNO व्हाइस अडमिरल ए. एन. प्रमोद. अरबी समुद्रातून पाकला काबूत ठेवण्यासाठी नौदल सज्ज होते.
नौदलाने अरबी समुद्रात जोरदार युध्दाभ्यास सुरू केला होता. कराची बंदरासह इतर महत्वाच्या शहरांवर मिसाईल डागण्याची तयारी केली होती. केवळ आक्रमक युध्दाभ्यासाने पाकचे सैन्य हादरले होते.