Rajanand More
पाकिस्तानने 7-8 मेच्या रात्री भारतातील 15 लष्करी तळांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. त्यासाठी ड्रोन आणि मिसाईलचा वापर करण्यात आल्याची माहिती केंद्र सरकारने दिली आहे.
भारताच्या यूएएस ग्रीड आणि एअर डिफेन्स सिस्टीमच्या माध्यमातून हे हल्ले परतवून लावल्याची माहिती सरकारने दिली आहे.
भारतीय लष्कराच्या S-400 या एअर डिफेन्स सिस्टीमने पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्र हवेतच निकामी करण्यात आली आहेत. या यंत्रणेला सुदर्शन चक्र असेही म्हटले जाते.
ही यंत्रणा जगातील सध्याची सर्वात आधुनिक यंत्रणा मानली जाते. स्टॉकहॉम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूटने हा दावा केला आहे.
एस-400 यंत्रणेचे चार प्रकार असून 40 किमी, 120 किमी, 200 ते 250 किमी आणि सर्वाधिक 400 किमी अंतरापर्यंत मिसाईल निकामी करण्याची क्षमता आहे.
चारही प्रकारच्या यंत्रणेचा वेग अनुक्रमे ताशी 3185 किमी, 3675 किमी, 7285 किमी आणि 17,287 किमी एवढा प्रचंड आहे.
भारताची एस-400 ही यंत्रणा बी-1, एफबी-111 आणि बी-52 सारखे बॉम्ब निकामी करू शकते. त्याचप्रमाणे वॉरफेअरसारखे विमान अर्ली वॉर्निंग रडार एअरप्लेन, फायटर प्लेन, बॅलेस्टिक मिसाईल आदींनाही टार्गेट करू शकते.
एस-400 ही यंत्रणा भारताने पहिल्यांदाच वापरल्याचे सांगितले जात आहे. भारताने रशियाकडून ही यंत्रणा घेतली आहे.