P V Narasimha Rao : पी व्ही नरसिंह राव यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतलेले महत्वाचे निर्णय..! वाचा एका क्लिकवर

सरकारनामा ब्यूरो

आर्थिक उदारीकरण आणि LPG धोरण (1991)

नरसिंह राव यांच्या नेतृत्वाखाली भारताने आर्थिक उदारीकरण ,खाजगीकरण आणि जागतिकीकरण (LPG) धोरणे स्वीकारली आणि राबवली.

P.V. Narasimha Rao | Sarkarnama

विदेशी व्यापार सुधारणा..

परकीय चलनाचा तुटवडा दूर करण्यासाठी भारताने निर्यातीवर अधिक भर दिला आणि आयातीसाठी परवाने रद्द करून व्यापार स्वातंत्र्य केले.

P.V. Narasimha Rao | Sarkarnama

'एफडीआय धोरण' लागू करणे..

परकीय थेट गुंतवणूक (FDI) भारतात आणण्यासाठी धोरणात्मक सुधारणा केल्या, ज्यामुळे जागतिक कंपन्यांना भारतीय बाजारपेठेत प्रवेश करता आला.

P.V. Narasimha Rao | Sarkarnama

परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून महत्वाची कामगिरी....

परराष्ट्र व्यवहार मंत्री म्हणून नरसिंह राव यांनी अमेरिका, पाकिस्तान, बांग्लादेश, इराण, व्हिएतनाम, टांझानिया,आदींच्या संयुक्त आयोगांचे अध्यक्षपद भूषवले.

P.V. Narasimha Rao | Sarkarnama

वित्तीय संस्थांची सुधारणा...

बँकिंग क्षेत्रात आणि आर्थिक व्यवस्थेत महत्त्वाच्या सुधारणा केल्या, ज्यामुळे वित्तीय संस्थांची कार्यक्षमता वाढली.

P.V. Narasimha Rao | Sarkarnama

गुप्तचर यंत्रणा अधिक मजबूत केली...

राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि परकीय धोरणांवर ठोस पावले उचलण्यासाठी त्यांनी गुप्तचर यंत्रणांना प्रोत्साहन दिले.

P.V. Narasimha Rao | Sarkarnama

स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक संरक्षण...

73 व्या आणि 74 व्या घटनादूरूस्तीने, स्थानिक स्वराज्य संस्थांना घटनात्मक संरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय नरसिंह राव यांनी घेतला होता.

P.V. Narasimha Rao | Sarkarnama

आंतरराष्ट्रीय संबंधात सुधारणा केली...

अमेरिका, रशिया, आणि इतर प्रगत राष्ट्रांशी भारताचे संबंध सुधारले. त्यांनी चीनसोबतही शांतता आणि व्यापार धोरणे सुधारली.

P.V. Narasimha Rao | Sarkarnama

Next : खवय्यांसाठी पर्वणी असलेल्या रेस्टॉरंटमध्ये राहुल गांधींचा 'फॅमिली लंच'; पाहा खास फोटो...

येथे क्लिक करा