Pradeep Pendhare
केंद्र सरकारने प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला पद्म पुरस्कारांची घोषणा केली.
पद्म पुरस्कार मिळालेल्यांना अनेक सुविधा मिळतात, अशी चर्चा असते. काय सुविधा मिळतात, त्याची माहिती घेऊया...
पद्मश्री, पद्मभूषण किंवा पद्मविभूषण पुरस्काराने गौरव झालेल्या कोणालाही आर्थिक, पेन्शन किंवा आर्थिक लाभ मिळत नाही.
पद्म पुरस्कार हा केवळ एक सन्मान आहे, विशेषाधिकार नाही.
पद्म पुरस्कार मिळणाऱ्यांना कोणत्याही प्रवासात सवलती किंवा सरकारी लाभ देत नाही.
पद्म पुरस्कार ही पदवी नसल्याने सन्मानित व्यक्ती नावापूर्वी किंवा नंतर पद्मश्री, पद्मभूषण किंवा पद्मविभूषण हे शब्द वापरू शकत नाही.
नावापुढे पद्मश्री असा उल्लेख असल्यास, सरकारला त्या व्यक्तीकडून पुरस्कार परत घेण्याचा अधिकार आहे.
पद्म पुरस्कारांसाठी सरकार नामांकने मागवते. कोणतीही व्यक्ती, संस्था, खासदार, आमदार किंवा मंत्री पात्र व्यक्तीची शिफारस करू शकतात.
राष्ट्रपती भवनात आयोजित एका विशेष समारंभात राष्ट्रपतींच्या हस्ते निवड झालेल्या व्यक्तींना पद्म पुरस्कार प्रदान केले जातात.