Padma Awards 2027 : पद्म पुरस्कारांसाठी तुम्हीही करू शकता अर्ज; अशी आहे प्रक्रिया, जाणून घ्या...

Rajanand More

पद्म पुरस्कार

पद्म पुरस्कार हे भारतातील सर्वोच्च नागरी सन्मानांपैकी एक आहेत हे पुरस्कार पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्म श्री अशा तीन श्रेणींमध्ये दिले जातात.

पात्रता

जात, व्यवसाय, पद किंवा लिंग यांचा भेदभाव न करता कोणतीही व्यक्ती या पुरस्कारांसाठी पात्र आहे. मात्र, डॉक्टर आणि शास्त्रज्ञ यांना वगळून सरकारी सेवेत असलेले कर्मचारी पात्र नसतात.

Padma Shri award | Sarkarnama

क्षेत्र कोणती?

कला, सामाजिक कार्य, राजकारण, सार्वजनिक जीवन, विज्ञान आणि अभियांत्रिकी व्यापार आणि उद्योग, वैद्यक, साहित्य आणि शिक्षण, नागरी सेवा, क्रीडा यांसह अध्यात्म, योग, वन्यजीव संरक्षण, पाककला, शेती, नवकल्पना, पुरातत्त्व, वास्तुकला आदी.

Padma Award | Sarkarnama

मरणोत्तर

साधारणपणे पद्म पुरस्कार मरणोत्तर दिले जात नाहीत. परंतु अत्यंत दुर्मिळ आणि काही प्रकरणांमध्ये सरकार मरणोत्तर पुरस्कार देण्याचा विचार करते.

Padma Bhushan Awardees | Sarkarnama

पुरस्कारांची संख्या

दरवर्षी दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांची एकूण संख्या मरणोत्तर पुरस्कार आणि परदेशी/एनआरआय यांना वगळून १२० पर्यंत असते.

Padma and Padma Shri awards | Sarkarnama

अर्ज कोण करू शकते?

वर्ष २०२७ साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून अर्ज किंवा नामांकन प्रक्रिया सर्वांसाठी खुली आहे. स्वतःचे नामांकन (Self-Nomination) देखील करता येते.

Padma and Padma Shri awards | Sarkarnama

कालावधी

केंद्र सरकारने नामांकनासाठी अर्ज मागविले आहे. ता. १५ मार्च ते ३१ जुलै या कालावधीत ऑनलाईन नामांकन अर्ज भरता येतील.

Padma and Padma Shri awards | Sarkarnama

निवड प्रक्रिया

अर्जांवर पद्म पुरस्कार समिती निर्णय. पंतप्रधानांकडून दरवर्षी ही समिती स्थापन केली जाते. समितीच्या शिफारशीनंतर पंतप्रधान आणि राष्ट्रपतींकडे मंजुरीसाठी पाठवल्या जातात. अंतिम यादी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर होते.

Padma Award Facilities | Sarkarnama

अर्ज कुठे कराल?

पुरस्कारांसाठी अर्ज https://awards.gov.in या संकेतस्थळावरून करता येतील. अर्ज केवळ ऑनलाईन स्वीकारले जाणार आहे.

Padma Award | Sarkarnama

NEXT : मुख्यमंत्र्यांचे लाडके डॅशिंग IPS अधिकारी अडकणार विवाह बंधनात; देशभरात का होतेय चर्चा?

येथे क्लिक करा.