राज ठाकरेंनी आक्षेप घेतलेलं अन् महापालिका निवडणुकीत EVM ला जोडलं जाणारं PADU मशीन नेमकं काय आहे?

Jagdish Patil

मतदान

उद्या 15 जानेवारी रोजी राज्यभरातील 29 महापालिकांसाठी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आलेय.

What is the PADU machine | Sarkarnama

वाद

मात्र मतदानाच्या आदल्या दिवशी 'ईव्हीएम'ला जोडल्या जाणाऱ्या 'पाडू' नावाच्या मशीनमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे.

What is the PADU machine | Sarkarnama

आक्षेप

पाडू मशीनवर राज ठाकरेंसह विविध राजकीय पक्षांनी आक्षेप घेत, या मशीनची माहिती आधीच का दिली नाही, असा आक्षेप घेतला आहे.

Raj Thackeray | Sarjarnama

माहिती

तर हे पाडू मशीन ईव्हीएमला का जोडलं जाणार आणि त्याचं काम काय? याबाबतची माहिती जाणून घेऊया.

What is the PADU machine

PADU

निवडणूक आयोग EVM मशीनला 'प्रिटिंग ऑक्झिलरी डिस्प्ले युनिट' म्हणजेच (PADU) मशीन जोडणार आहे.

Election Commission | Sarkarnama

बॅकअप

हे उपकरण कंट्रोल युनिटची हुबेहूब प्रतिकृती असून ते बॅकअप यंत्रणा म्हणून काम करते.

EVM Voting Machine | Sarkarnama

प्रात्यक्षिक

या नवीन यंत्रणेचे प्रात्यक्षिक विविध राजकीय पक्षांना दाखवण्यात आलं असून मतमोजणीच्या दिवशीही ते पुन्हा एकदा दाखवलं जाणार आहे.

EVM | Sarkarnama

ऑक्सिलरी डिस्प्ले

'पाडू मशीन' हे मतदान यंत्रातील डेटा वाचणारे आणि ऑक्सिलरी डिस्प्ले देणारं यंत्र आहे.

EVM | Sarkarnama

वापर

मतमोजणीच्या वेळी मुख्य कंट्रोल युनिटचा डिस्प्लेमध्ये बिघाड झाल्यास किंवा त्यातून निकाल दिसण्यात अडचण आली असेल तर 'पाडू'चा वापर केला जातो.

EVM | Sarkarnama

राज ठाकरे

या तांत्रिक बदलाबाबत आयोगाने राजकीय पक्षांना पूर्वकल्पना दिली नाही. हे मशीन काय काम करतं? यात गडबड होणार नाही हे कशावरून? असे प्रश्न राज ठाकरेंनी उपस्थित केलेत

Raj Thackeray | Sarkarnama

NEXT : मतदारांनो सावधान! 'या' 12 पैकी किमान एक तरी ओळखपत्र हवेच..., अन्यथा 15 जानेवारीला मतदानाला मुकाल

duplicate voter ID | Sarkarnama
क्लिक करा