Jagdish Patil
जम्मू काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्याला आज (ता. २२ एप्रिल) एक वर्ष पूर्ण झालं.
या हल्ल्यात पर्यटकांचा जीव वाचवताना स्थानिक घोडेवाला सय्यद आदिल हुसेन शाह शहीद झाला होता.
या शौर्याचा सन्मान करण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेने त्यावेळी आदिलच्या कुटुंबाला 5 लाखांची मदत केली होती.
शिवाय त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आदिलच्या कुटुंबियांना पक्के घर बांधून देण्याचं आश्वासनही दिलं होतं.
हे दिलेलं आश्वासन शिंदेंनी पूर्ण केलं असून त्यांनी आदिलच्या कुटुंबियांना नवीन घर बांधून दिलं आहे.
हे घर आदिलच्या कुटुंबियांच्या ताब्यात देताना शिंदेंनी कश्मिरी नागरिकांशी 'व्हिडिओ कॉन्फरन्स'द्वारे संवाद साधला.
या नव्या घराला 'आनंद नाथ सदन' हे नाव गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे यांच्या स्मरणार्थ दिल्याचं शिंदेंनी यावेळी सांगितलं.
'आनंद नाथ सदन' हे केवळ घर नव्हे तर ते एका वीराच्या बलिदानाचा सन्मान असल्याचंही शिंदे म्हणाले.
या नवीन घराचे फोटो आता समोर आले ज्यामध्ये घराचं बांधकाम चांगल्या पद्धतीने केल्याचं दिसत आहे.
घरामध्ये प्रशस्त किचन तयार करण्यात आलं असून त्यामध्ये इतर सर्व सोयी सुविधा दिल्याचं दिसतं आहेत.