Rashmi Mane
भारत आणि पाकिस्तानमध्ये प्रचंड तणाव वाढला असून सीमा भागात हल्ले सातत्याने होत आहेत.
दोन्ही बाजूंच्या अनेक सीमावर्ती शहरे आणि गावे त्याच्या कचाट्यात आली आहेत. चला तर मग जाणून घेऊया भारताच्या सीमेला लागून पाकिस्तानची कोणती शहरे आहेत?
भारताच्या सीमेला लागून असलेल्या पाकिस्तानच्या प्रमुख शहरांमध्ये इस्लामाबाद, लाहोर, कराची आणि फैसलाबाद यांचा समावेश आहे.
या प्रमुख शहरांव्यतिरिक्त, अशी अनेक लहान-मोठी गावे आणि शहरे आहेत जिथे लष्कराची महत्त्वाची केंद्रे आहेत.
जम्मू आणि काश्मीरच्या सीमेला लागून सियालकोट, झेलम, वजीराबाद, अबोटाबाद अशी शहरे आहेत.
पंजाबच्या सीमेजवळ लाहोर, मुरीदके, कसूर अशी शहरे आहेत.
याशिवाय राजस्थानच्या सीमेला लागून पाकिस्तानची अनेक शहरे आहेत. यामध्ये बहावलपूर, बहावलनगर, सुक्कूर, सादिकाबाद, रहिमयार खान, उमरकोट या शहरांचा समावेश आहे.
याशिवाय, बुरेवाला, साहिवाल, खैरपूर, पट्टोकी सारखी पाकिस्तानची छोटी शहरे देखील भारताच्या जवळ आहेत.