Pakistan Attack on India : पाकिस्तानची नवी कारस्थानं 'Dance of the Hillary', फाईलवर क्लिक केला तर होईल मोठा घात; नेमका काय आहे हा व्हायरस ?

Rashmi Mane

‘ऑपरेशन सिंदूर’

‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान भारतीय लष्कराने पाकिस्तानातील दहशतवादी तळांवर केलेल्या अचूक हल्ल्यांनंतर, पाकिस्तान भारताविरोधात सायबर युद्धाच्या तयारीत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Pakistan Cyber Attack on India | Sarkarnama

भारतीय लष्कराने

भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या कारवायांना कठोर प्रत्युत्तर दिले असून, त्यांनी दहशतवादी कारवायांसाठी वापरले जाणारे ठिकाणे उद्ध्वस्त केली आहेत.

Pakistan Cyber Attack on India | Sarkarnama

सायबर हल्ले

यामुळे पाकिस्तानच्या आंतरराष्ट्रीय स्तरावर झालेल्या अपमानामुळे त्यांनी आता सायबर पातळीवर कुरापत काढण्याचा प्रयत्न चालवला असल्याचे गुप्तचर सूत्रांचे मत आहे.

Pakistan Cyber Attack on India | Sarkarnama

गुप्तचर यंत्रणेचा सतर्कतेचा इशारा

गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या इनपुटनुसार, पाकिस्तानकडून भारतीय नागरिक व संस्थांवर सायबर हल्ल्यांची शक्यता असून सर्वसामान्यांनी अत्यंत सावध राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Pakistan Cyber Attack on India | Sarkarnama

सतर्कतेचा इशारा

गुप्तचर विभागांनी दिलेल्या सतर्कतेनुसार, पाकिस्तानमधील सायबर सेल भारतीय नागरिकांना अज्ञात लिंक, फसवणुकीच्या वेबसाइट्स किंवा हॅकिंग साधनांचा वापर करून लक्ष्य करू शकतो.

Pakistan Cyber Attack on India | Sarkarnama

 धोकादायक लिंक...

या पार्श्वभूमीवर, नागरिकांनी कोणत्याही अनोळखी ईमेल, मेसेज किंवा लिंकवर क्लिक करू नये, तसेच कोणतीही संशयास्पद फाइल डाऊनलोड करू नये, असा सल्ला देण्यात आला आहे.

Pakistan Cyber Attack on India | Sarkarnama

या हल्ल्यापासून वाचण्यासाठी

  1. अँटीव्हायरस सॉफ्टवेअर वापरा.

  2. तुमची ऑपरेटिंग सिस्टम अपडेट ठेवा.

  3. संशयास्पद लिंक्स आणि अटॅचमेंटवर क्लिक करणे टाळा.

  4. मजबूत पासवर्ड वापरा.

  5. अ‍ॅप डाउनलोड करताना काळजी घ्या.

Pakistan Cyber Attack on India | Sarkarnama

सोशल मीडिया टार्गेटवर

सरकारने लोकांना व्हॉट्सअॅप, इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करताना सावधगिरी बाळगण्याचा इशारा दिला आहे. अज्ञात नंबर किंवा खात्यांवरून पाठवलेल्या दुर्भावनापूर्ण लिंक्स किंवा बनावट फाइल्सद्वारे वापरकर्त्यांना लक्ष्य केले जाण्याचा मोठा धोका आहे.

Pakistan Cyber Attack on India | Sarkarnama

Next : युद्धाचे नियम काय? जाणून घ्या, जिनेव्हा कराराबद्दल" 

येथे क्लिक करा