Mayur Ratnaparkhe
पाकिस्तान भारताच्या तुलनेत सगळ्याच बाबतीत दुबळा आहेच, शिवाय आता कंगालही आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानात टोकाचा तणाव निर्माण झालेला आहे.
सध्या पाकिस्तानची राजकोषीय तूट ७.४ टक्क्यांपर्यंत पोहचली आहे. जी पाकिस्तानसाठी अतिशय चिंताजनक आहे.
वर्ष २०२४-२५ साठी पाकिस्तानचा जीडीपी वृद्धी दर केवळ ३.१ टक्के राहण्याचा अंदाज आहे.
ऑक्टोबर २०२४ पर्यंत पाकिस्तान सरकारचे एकूण कर्ज वाढून विक्रमी ७०.३६ लाख कोटी पाकिस्तानी रुपये झाले आहे.
याचा अर्थ असा आहे की प्रत्येक पाकिस्तानी नागरिकावर सरासरी २.३४ लाख पाकिस्तानी रुपयांचे कर्ज आहे.
आंतरराष्ट्री एजन्सी फिच रेटींग्सच्या नुसार पाकिस्तानाला आर्थिक वर्ष २०२५मध्ये २२०० कोटी डॉलर्सपेक्षा जास्त बाहेर कर्ज फेडावे लागले.
कर महसूल देखील अतिशय कमी आहे. २०२४मध्ये कर वसूलीचा हिस्सा जीडीपीमध्ये केवळ ६.८ टक्के होता.
जागतिक बँकेने अंदाज वर्तवला आहे की, या वर्षाच्या शेवटापर्यंत ७४ टक्के पाकिस्तानी उपासमारीच्या उंबरठ्यावर पोहचतील.