Aslam Shanedivan
UPSC
पीएससीची परीक्षा ही अत्यंत कठीण असते. यामध्ये मेहनत, जिद्द आणि चिकाटी याला पर्याय नसतो.
तीन वर्षे अथक परिश्रम, कुठेही नोकरी नाही फक्त अभ्यासावर लक्ष केंद्रित करत आर्थिक परिस्थिती कमकुवत असताना लांजाच्या सृष्टी सुरेश कुळ्ये हिने युपीएससी पास झाली.
सृष्टीची परिस्थितीच बिकट असताना व अभ्यासासाठी आर्थिक बळ नसताना या परिक्षेत तिने यश मिळवले आहे
सृष्टी कुळये हिने आपले सातवीपर्यंतचे शिक्षण मोहीते-पाटील विद्यालय मानखुर्द मध्ये पूर्ण केले. त्यानंतर पुढे तिने आठवी ते दहावीचे शिक्षण ज्ञानसंपदा हायस्कूल शिवाजीनगर, गोवंडी येथे घेतले.
तसेच महाविद्यालयीन शिक्षण तिने रामनारायण कॉलेज, माटुंगा मधून घेऊन कला विषयात पदवी मिळवली. शिक्षण घेत असतानाच तिने युपीएससीची तयारी लायब्ररीत केली.
सृष्टीने 2022 पासून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेची तयारी करत रोज 12 ते 14 तास अभ्यास केला. हा तिचा युपीएससी मधील हा दुसरा प्रयत्न होता.
कोणतेही खासगी क्लासेस न लावता नियोजनबद्ध, शिस्तबद्ध अभ्यास, सतत सराव, वेळेचं व्यवस्थापन आणि प्रत्येक विषयावर सखोल लक्ष देत तिने दुसऱ्या प्रयत्नात 831 वा क्रमांक
सृष्टीचे वडील हे प्रिंटिंग मशीन ऑपरेटर असून तिची आई सपना कुळये या गृहीणी आहेत. सृष्टी, साहिल आणि सिद्धी असे तीन भांवडे असून सृष्टी सर्वात मोठी आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.