संघर्ष थांबताच पाकिस्तानातील हिंदू तरूणी चर्चेत; कशिश चौधरीने रचला इतिहास...

Rajanand More

भारत-पाक संघर्ष

मागील काही दिवसांपासून भारत आणि पाकिस्तानमध्ये मोठा संघर्ष सुरू होता. दोन्ही देशांकडून एकमेकांवर हल्ले करण्यात आले. यामध्ये पाकची त्रेधातिपिट उडाली. भारताने पाकला चांगलीच अद्दल घडवली.

India Vs Pakistan | Sarkarnama

इतिहास रचला

दोन्ही देशांमध्ये शस्त्रसंधी झाल्याने संघर्ष थांबला. त्यातच पाकमधील बलुचिस्तान प्रांतातील एका 25 वर्षीय हिंदू तरूणीने इतिहास घडवला आहे.  

Balochistan | Sarkarnama

कशिश चौधरी

कशिशने बलुचिस्तान लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. तिची सहायक आयुक्तपदी नियुक्ती झाली असून ती हे पद मिळविणारी पहिली हिंदू महिला ठरली आहे.

kashish chaudhary | Sarkarnama

तीन वर्षे तयारी

लोकसेवा आयोगाच्या परीक्षेसाठी कशिश यांनी सतत तीन वर्षे अभ्यास केला होता. अखेर त्यांच्या कष्टाचे चीज झाले आहे.

kashish chaudhary | Sarkarnama

मुख्यमंत्र्यांची भेट

कशिश या बलुचमधील चागई जिल्ह्यातील नौशकी या दुर्गम भागातील रहिवासी आहेत. नियुक्तीनंतर कशिश व त्यांचे वडील मुख्यमंत्री सरफराज बुगती यांना भेटण्यासाठी क्वेटा येथे गेले होते.

kashish chaudhary | Sarkarnama

तरुणींसाठी प्रेरणा

पाकिस्तानातील अनेक हिंदू तरूणींसाठी आता त्या प्रेरणा बनल्या आहेत. ही पदे महिलांसाठी आवक्याबाहेर मानली जात होती.

kashish chaudhary | Sarkarnama

वडिलांना अभिमान

कशिश यांचे वडील गिरधारी लाल यांनी मुलीच्या या यशाबद्दल आनंद व्यक्त केली. ही आपल्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. 

kashish chaudhary | Sarkarnama

अभिमानाचे प्रतिक

मुख्यमंत्र्यांनीही कशिश यांचे कौतुक केले. अल्पसंख्यांक समाजातील व्यक्तीने समर्पण आणि परिश्रमाद्वारे अशा पदांवर पोहचणे म्हणजे बलुचिस्तानसाठी अभिमानाचे प्रतिक असल्याचे ते म्हणाले.

kashish chaudhary | Sarkarnama

NEXT : बलुचिस्तानप्रमाणेच 'या' प्रांतालाही व्हायचंय पाकिस्तानपासून वेगळं, काय कारण?

येथे क्लिक करा.