Rashmi Mane
ज्याप्रमाणे भारताच्या राष्ट्रीय ध्वजाला तिरंगा म्हणतात, त्याचप्रमाणे पाकिस्तानी लोक त्यांच्या ध्वजाला काय म्हणतात माहितीये?
राष्ट्रध्वज ही प्रत्येक देशाची ओळख असते. लोकांना त्यांच्या देशाबद्दल आदर आणि अभिमान असतो.
सामान्यतः ध्वजाला त्याच्या देशाच्या नावाने संबोधले जाते जसे की - पाकिस्तानचा ध्वज, अमेरिकेचा ध्वज किंवा चीनचा ध्वज पण भारतात याच ध्वाजाला तिरंगा म्हणतात.
पाकिस्तानमध्ये त्याच्या ध्वजाला "परचम-ए सितारा ओ-हिलाल" (Parcham-e Sitārah o-Hilāl) असे म्हणतात, ज्याचा अर्थ "चंद्रकोर आणि ताऱ्याचा ध्वज" असा होतो. हा झेंडा अमीरुद्दीन किदवाई यांनी डिझाइन केला होता.
या ध्वजाची डिझाइन गडद हिरव्या रंगाचा असून, त्यात एक पांढरी उभी पट्टी, मध्यभागी एक पांढरी अर्धचंद्र आणि पाच टोकांचा तारा आहे.
पाकिस्तानच्या राजधानीत, इस्लामाबादमध्ये, हा ध्वज "परचम-ए सितारा ओ-हिलाल" या नावाने ओळखला जातो.
या ध्वजाच्या डिझाइनमध्ये हिरवा रंग मुस्लिम बहुसंख्यांकांचे प्रतिनिधित्व करतो, तर पांढरी पट्टी अल्पसंख्याकांचे. अर्धचंद्र प्रगतीचे प्रतीक आहे आणि तारा प्रकाश आणि ज्ञानाचे प्रतीक मानले जाते.