Pradeep Pendhare
भारतीय लष्कराच्या 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानच्या लष्करात अनेक मोठे बदल होताना दिसत आहे.
पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारने लष्करप्रमुख आणि 'फिल्ड मार्शल' या पदांना संवैधानिक दर्जा देण्याचा निर्णय घेतला आहे.
पाकिस्तानमध्ये राष्ट्रपतींचे पद संवैधानिक आहे, तर लष्करप्रमुखांचे पद कार्यकारी आणि प्रशासकीय आहे.
पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारने संसदेत 27वी घटनादुरुस्ती करत लष्करप्रमुखांना प्रचंड अधिकार मिळतील, असे म्हटले जाते.
पाकिस्तान सरकारच्या दुरुस्तीमुळे लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे संपूर्ण कमांड, 'संरक्षण दल प्रमुखां'ना मिळणार आहे.
कायदा मंत्री आझम नझीर तरार यांनी संसदेच्या दोन्ही सभागृहात दोन तृतीयांश बहुमताने मंजूर झाल्याशिवाय प्रस्ताव संविधानाचा भाग होणार नाही.
पाकिस्तान सरकारच्या संविधान कलम 243मध्ये दुरूस्ती करून, पाकिस्तानच्या लष्करप्रमुखांना "संरक्षण दलांचे प्रमुख" हे पद देण्यात यावे, असा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
संविधानात अशीही तरतूद असेल की, 'फिल्ड मार्शल'चा दर्जा आणि त्याच्याशी संबंधित विशेषाधिकार आजीवन असतील.