Ganesh Sonawane
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमधील संघर्ष ड्युरंड रेषेवर तीव्र झाला आहे. दोन्ही देशांमध्ये क्षेपणास्त्र आणि हल्ल्यांची मालिका सुरू आहे.
अफगाणिस्तानने शनिवारी पाकिस्तानवर प्रतिहल्ला करून 58 पाक सैनिक ठार केले. 25 चौक्या ताब्यात घेत 7 सैनिकांना ओलीस ठेवलं.
ग्लोबल फायरपॉवर 2025 रँकिंगनुसार पाकिस्तान जगात 12 व्या क्रमांकावर आहे. त्यांच्या सैन्यात 17 लाख कर्मचारी आहेत.
1998 पासून पाकिस्तानकडे अण्वस्त्रसाठा आहे. चीनकडून मदत मिळाल्याने पाकिस्तानची अण्वस्त्रे आणखी मजबूत झाली आहेत.
2015 ते 2024 दरम्यान पाकिस्तानच्या शस्त्रास्त्र आयातीत 61% वाढ झाली. 81% शस्त्रे चीनकडून घेतली गेली आहेत.
ग्लोबल फायरपॉवरमध्ये अफगाणिस्तान 118 व्या स्थानावर आहे. तालिबानकडे फक्त 80 हजार सैनिक आणि हलकी शस्त्रे आहेत. तसेच 30 हजार निमलष्करी दलाचे कर्मचारी आहेत.
अफगाणिस्तानकडे फक्त 40 लढाऊ विमाने, 30 हेलिकॉप्टर आणि 50 रणगाडे आहेत. हवाई दल व क्षेपणास्त्र प्रणाली जवळपास नाहीच.
आधुनिक शस्त्रांचा अभाव असला तरी तालिबानकडे दीर्घकाळ लढण्याची गनिमी रणनीती आहे, जी सीमाभागात पाकिस्तानसाठी डोकेदुखी ठरते.