Roshan More
भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान मानला जातो. हा सन्मान राष्ट्रसेवेसाठी दिला जातो.
पहिला भारतरत्न पुरस्कार 1954 मध्ये डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन, चक्रवर्ती राजगोपालाचारी आणि डॉ. सी.व्ही. रमण यांना देण्यात आला.
भारतरत्न फक्त भारतीय नागरिकांनाच दिला जातो, असे नाही. हा सन्मान काही परदेशी व्यक्तींनाही प्रदान करण्यात आला आहे.
एका पाकिस्तानी नागरिकालाही भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देण्यात आला आहे.
1987 साली पाकिस्तानी नागरिक अब्दुल गफ्फार खान यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला होता.
अब्दुल गफ्फार खान यांनी ब्रिटीशांविरोधात संघर्ष केला. पाकिस्तानी सरकारविरोधात अहिंसक आंदोलन केले. ते हिंदू-मुस्लिम ऐक्याचे समर्थक म्हणून ओळखले जातात.
अब्दुल गफ्फार खान स्वातंत्र्यलढ्यात महात्मा गांधींसोबत होते आणि त्यांनी अहिंसेचा झेंडा सदैव उंच ठेवला. त्यामुळे त्यांना सरहद गांधी म्हणून ओळखले जातात.