Aslam Shanedivan
प्रसिद्ध तारपा वादक, अनेक पुरस्कारांनी सन्मानित भिकल्या लाडक्या धिंडा यांना अतिशय प्रतिष्ठेचा पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे.
९० वर्षीय आदिवासी कलाकार भिकल्या लाडक्या धिंडा यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्याने आदिवासी संस्कृतीचा सन्मान झाला आहे
या घोषनेनंतर आता केवळ एका कलाकाराचा नव्हे, तर पिढ्यान्पिढ्या जपल्या गेलेल्या आदिवासी लोककलेचा सन्मान असल्याची भावना व्यक्त होत आहे.
भिकल्या धिंडा हे जव्हार तालुक्यातील वाळवंडा गावचे रहिवासी असून घरातच दीडशे वर्षांपासून तारपा वादनाची परंपरा आहे
त्यांचे आजोबा नवसु धाकल्या धिंडा आणि वडील लाडक्या धाकल्या धिंडा हेही निष्णात तारपा वादक होते. त्यामुळे वयाच्या दहाव्या वर्षापासून जंगलात गुरेढोरे चारताना ते तारपा वाजवत
भिकल्या धिंडा यांना तारपा शिरोमणी पदवी, सांस्कृतिक सेनानी सन्मान, तसेच राष्ट्रीय संगीत, नृत्य व नाटक अकादमी, नवी दिल्ली कडून संगीत नाटक अकादमी पुरस्कार मिळाला आहे.
“तारपा हा आमचा देव आहे,” असे सांगणारे धिंडा यांना हा पुरस्कार आदिवासी लोककलावंतांसाठी आशेचा किरण ठरला आहे.