सरकारनामा ब्यूरो
अमरावती येथील कॅम्प विभागातील झोपडपट्टीत राहणाऱ्या पल्लवी चिंचखेडे यांचे वडील रंगकाम तर आई शिलाई काम करत त्यांचा उदरनिर्वाह करत होते.
त्यांच्या आई वडिलांच्या मते, आपण आपल्या हालकीच्या परिस्थितीमुळे चांगले शिक्षण घेऊ शकलो नाही पण आपल्या मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे यासाठी त्यांनी आहोरात्र कष्ट करत. पल्लवी यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन केले.
लहानपणापासूनचं अभ्यासात प्रचंड हुशार असलेल्या पल्लवी यांनी वडिलांना मदत म्हणून रंगकाम करत इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले.
त्यांनी सातवीपासून स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. शाळेत होणाऱ्या स्पर्धा परीक्षेच्या कार्यशाळात त्या स्पर्धा परीक्षेत सहभागी होत असे. पण परिस्थितीमुळे त्यांनी त्यांच्या अभ्यासावर लक्ष दिले.
शिक्षणानंतर त्यांना चांगल्या पगाराची नोकरी लागल्याने कुटुंबाला आनंद झाला. परंतु, त्यांना UPSC ची परीक्षा देण्याची इच्छा सतत मनात येत होती.
त्यांनी परीक्षेच्या तयारी सुरु केली. परीक्षेसाठी दिल्लाला जावा लागणार असल्याने त्यांनी नोकरी सोडली.
2021 ला त्यांनी परीक्षा दिली आणि यात मेन्स क्लिअर करत UPSCची परीक्षा उत्तीर्ण केली.
2022 ला परीक्षेचा निकाल जाहीर झाला यात त्यांना ऑल इंडिया 63वा रँक मिळाला.