Pandharpur : पंडित नेहरुंना ठेच लागली अन् विठ्ठलाच्या मंदिरातील उंबराच बदलला!

सरकारनामा ब्युरो

श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिर -

पंढरपूरच्या श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात प्रवेश करताना पूर्वी एक दगडी उंबरा होता.

Pandharpur Vitthal Temple | Sarkarnama

भाविकांची गैरसोय -

देवळातील गाभाऱ्यात जाण्यासाठी हा दगडी उंबरा ओलांडून जावे लागत असे. या उंबऱ्यामुळे वृद्ध भाविकांना आत-बाहेर जाणे-येणे अवघड होत होते.

Pandharpur Vitthal Temple | Sarkarnama

पंडित जवाहरलाल नेहरु पंढरपूर -

अशात 1953 मध्ये भारताचे तत्कालिन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु पंढरपूरला आले होते.

Pandit Nehru | Sarkarnama

नेहरुंना त्रास झाला -

पंडित नेहरु यांचे वय झाल्याने त्यांनाही हा दगडी उंबरा ओलांडून जाताना त्रास झाला. यांना ठेच लागली आणि चालताना काहीसे अडखळले.

Pandit Nehru | sarkarnama

दगडी उंबरा काढला -

यानंतर मंदिर प्रशासनाने पुरातत्व विभागाशी चर्चा करून हा उंबरा काढून टाकत नवीन उंबरा टाकला.

Pandharpur Vitthal Temple | Sarkarnama

भाविकांची सोय -

यामुळे वयस्कर भाविकांनाही सहज गाभाऱ्यात जाता येऊ लागले. आता तसा दगडी उंबरा फक्त रुक्मिणी मंदिरात पाहायला मिळतो.

Pandharpur Vitthal Temple | Sarkarnama

तर्कशुद्ध कारण -

हा उंबरा काढण्यामागे काही अपशकून असल्याच्या कथा सांगण्यात येतात, पण त्यामागील हे खरे तर्कशुद्ध कारण असल्याचे सांगितले जाते.

Pandharpur | Sarkarnamna

सरकारी नोकरीची संधी; 27 लाखांचं जबरदस्त पॅकेज, जाणून घ्या अर्जाची प्रक्रिया

<strong>येथे क्लिक करा</strong>