Panjabrao Dakh : पंजाबराव डख लोकसभेच्या आखाड्यात

Vijaykumar Dudhale

परभणी जिल्ह्यातील रहिवासी

पंजाबराव डख हे परभणी जिल्ह्यातील गुगळी धामणगावचे रहिवासी आहेत.

Panjabrao Dakh | Sarkarnama

हवामानाचा अचूक अंदाज

पंजाबराव डख यांनी 1999 पासून संगणकावर उपग्रहांच्या फोटोवरून हवामानाचा अंदाज सुरू केला. उपग्रहांसोबत निसर्गाच्या पारंपरिक खाणाखुणांच्या अभ्यासावरून ते हवामानाचा अचूक अंदाज वर्तवू लागले.

Panjabrao Dakh | Sarkarnama

शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय

पंजाबराव डख सध्या मोबाइलवरून पावसाच्या अंदाजाची अचूक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्याचे काम करत आहेत. पावसाच्या अचूक अंदाजामुळे ते राज्यातील शेतकऱ्यांमध्ये कमालीचे लोकप्रिय आहेत.

Panjabrao Dakh | Sarkarnama

पंजाबराव डख यांच्यावर आक्षेप

पंजाबराव डख यांच्या हवामानाच्या अंदाजाला शास्त्रीय दृष्टिकोन नसतो, असा आक्षेप त्यांच्यावर हवामान विभागातील तज्ज्ञांकडून घेतले जातात.

Panjabrao Dakh | Sarkarnama

'वंचित'कडून लोकसभेची उमेदवारी

ॲड. प्रकाश आंबेडकर प्रमुख असलेल्या वंचित बहुजन आघाडीकडून परभणी मतदारसंघातून पंजाबराव डख यांना लोकसभेची उमेदवारी जाहीर झाली आहे.

Panjabrao Dakh | Sarkarnama

उगले यांची उमेदवारी रद्द

वंचित बहुजन आघाडीने परभणीतून अगोदर बाबासाहेब उगले यांना उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, आंबेडकर यांनी उगले यांची उमेदवारी रद्द करून डख यांना उमेदवारी जाहीर केली आहे.

Panjabrao Dakh | Sarkarnama

परभणीतून उमेदवारी अर्ज भरला

ज्येष्ठ हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी परभणी लोकसभा मतदारसंघातून गुरुवारी (ता. 4 एप्रिल) आपला उमेदवारी अर्ज भरला आहे.

Panjabrao Dakh | Sarkarnama

परभणीत तिरंगी लढत

परभणी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय जाधव, महायुतीकडून महादेव जानकर आणि ‘वंचित’चे पंजाबराख डख यांच्यात तिरंगी लढत होणार आहे.

R

Panjabrao Dakh | Sarkarnama

काँग्रेसचा प्रवक्ता आता करणार भाजपचा ‘गौरव’; कोण आहेत गौरव वल्लभ?

Gourav Vallabh | Sarkarnama
Next : येथे क्लिक करा