सरकारनामा ब्यूरो
IAS कुमार राजीव रंजन यांच्याविरोधात CBI ने सर्च ऑपरेशन सुरु केले आहे. काय आहे यांचे कारण वाचा...
राजीव रंजन ज्या ठिकाणावर रुजू होते, अशा सर्व ठिकाणी CBI ने शोध मोहीम राबवली आहे. त्यांच्याकडे प्रचंड बेहिशेबी मालमत्ता असल्याने ही शोधमोहीम सुरु आहे.
जम्मू पासून ते बनारस, पटना आणि गुरुग्राम असा ठिकाणी ही शोध मोहीम सुरु आहे.
जम्मू काश्मीर येथे चर्चेत असलेला बनावट बंदूक परवाना घोटाळ्यात त्यांचे नाव आल्याने केंद्र सरकारने त्यांच्याविरोधात खटला चालवण्यास सीबीआयला परवानगी दिली आहे.
जम्मू-कश्मीरच्या अनेक जिल्ह्यात 2012 ते 2016 या कालावधीत त्यांनी 2.74 लाख बदूकांना परवाने काढून दिले आहेत. त्यांनी नियमांचे उल्लंघन करून परवाने दिले होते.
राजीव हे 2010 बॅचचे अरुणाचल प्रदेश-गोवा-मिझोराम आणि केंद्रशासित प्रदेश (AGMUT) केडरचे IAS अधिकारी आहेत.
राजीव यांनी UPSC परीक्षा उत्तीर्ण करत 866 वा रँक मिळवला आहे. ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांचे पहिले पोस्टिंग महसूल विभागातील उपसचिव या पदावर करण्यात आले होते.