Rashmi Mane
बीड लोकसभा निवडणूक उमेदवार भाजपच्या पंकजा मुंडे यांच्या प्रतिज्ञापत्रात एकूण 46 कोटी 11 लाख रुपयांची संपत्ती असल्याची माहिती दिली आहे.
पंकजा यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षात 10 कोटी 67 लाख रुपयांनी वाढ झाली असल्याचे निदर्शनास आले आहे.
पंकजा मुंडे यांच्याकडे 6 कोटी 17 लाख 58 हजार 708 रुपयांची जंगम मालमत्ता असून तसेच 4 कोटी 45 लाख 24 हजार 760 रुपये स्थावर मालमत्ता आहे.
त्यात विविध बँकांच्या ठेवी, विविध कंपन्यांचे रोखे आणि बँकांचे शेअर्स आणि सोन्याचा समावेश आहे.
पंकजा मुंडे यांच्याकडे 32 लाख 85 हजार रुपये किमतीचे 450 ग्रॅम सोने आणि 3 लाख 28 हजार रुपये किमतीची 4 किलो चांदी आहे.
पंकजाताईंचे पती चारुदत्त पालवे यांनी डॉ.प्रीतम मुंडे यांच्याकडून 65 लाख आणि यशश्री मुंडे यांच्याकडून 35 लाख रुपयांचे कर्ज घेतले असल्याची नोंद या प्रतिज्ञापत्रात करण्यात आली आहे.
पंकजा मुंडे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी दाखल केला होता. आता निवडणुकीत जनता कोणाला कौल देते हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.
बीड लोकसभा मतदारसंघासाठी सोमवारी म्हणजेच 13 मे रोजी मतदान होणार आहे.