Sachin Waghmare
माजी मंत्री पंकजा मुंडेंनी श्रीक्षेत्र मोहटादेवी मातेचं दर्शन घेतले. देवीची खण-नारळाने ओटी भरून आशीर्वाद घेतले.
दिलीप खेडकर यांनी देवीला चांदीचा मुकुट अर्पण केल्याने समाधान मिळाले.
पंकजा मुंडे यांना उमेदवारी मिळावा, यासाठी श्री क्षेत्र मोहटा देवीला केलेल्या नवसाची पूर्ती केली.
शिवशक्ती यात्रेदरम्यान मोहटा देवीला येता आले नाही. त्यामुळे आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचे सांगितले.
मंदिरात जाण्यापूर्वी कार्यकर्त्यांनी त्यांचं वाहनाचा ताफा थांबवून स्वागत केलं.
बीड जिल्ह्यात प्रवेश करत असताना सीमेवर केले स्वागत.
खासदार सुजय विखे, आमदार मोनिका राजळे, शिवाजीराव कर्डिले यांच्यसह भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मोहटादेवीचे आशीर्वाद घेऊन बीड जिल्ह्यात जाऊन प्रचाराला सुरूवात करणार आहेत.
महायुतीचे पदाधिकारी व आष्टी तालुक्यातील स्थानिक ग्रामस्थांनी उत्स्फूर्त स्वागत केले.