Jagdish Patil
ज्येष्ठ समाजवादी नेते, विचारवंत पन्नालाल सुराणा यांचं वयाच्या 93 व्या वर्षी निधन झालं.
मंगळवारी (ता.02) रात्री रात्री जेवणानंतर तब्येत बिघडल्यामुळे त्यांना एका रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली.
आयुष्यभर सामाजिक कार्य करणाऱ्या सुराणा यांचे पार्थिव शरीर शासकीय रूग्णालयाला देहदान करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तर आपलं आयुष्य सामाजिक कार्यसाठी वाहून घेणारे पन्नालाल सुराणा यांचा जीवनप्रवास नेमका कसा होता ते जाणून घेऊया.
सुराणा यांचा जन्म 9 जुलै 1933 रोजी सोलापूर जिल्हातील बार्शी येथे झाला. शालेय जीवनातच ते राष्ट्र सेवा दलाशी जोडले गेले.
विनोबांच्या भूदान चळवळीत ते सामील झाले होते. तरूणपणात जयप्रकाश नारायण यांच्या बिहारमधील सोखादेवरा येथील सर्वोदय आश्रमात त्यांनी काम केलं.
महाविद्यालयातील शिक्षणानंतर त्यांनी पत्रकारिताकेली. ते मराठवाडा दैनिकाचे संपादक होते.
'ग्यानबाचं अर्थकारण' हे पुस्तक त्याचं प्रसिद्ध आहे. समाजवाडी पक्षाच्या राज्य शाखेचे आणि समाज प्रबोधन संस्थेचे सचिव म्हणून त्यांनी काम केलं होतं.
आणीबाणीच्या काळात त्यांनी 18 महिने तुरुंगवास भोगला. तर मराठवाड्यातील भुकंपामुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी त्यांनी 'अपना घर' ही संस्था सुरु केली.