Pappu Yadav News : 17 वर्षे तुरुंगवास भोगलेल्या बाहुबली नेत्याचा अख्खा पक्षच काँग्रेसमध्ये विलीन; पाहा फोटो!

Chetan Zadpe

काँग्रेसमध्ये पक्ष विलीन -

बिहारचे दिग्गज नेते पप्पू यादव यांनी आपला जनाधिकार पक्ष (जेएपी) काँग्रेसमध्ये विलीन केला आहे. पप्पू यादव आता काँग्रेसच्या तिकिटावर पूर्णिया मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.

Pappu Yadav | Sarkarnama

17 वर्षे तुरुंगवास -

पप्पू यादव हे जितके मोठे नाव आहे तितकेच ते वादग्रस्त आहेत. सीपीएम नेते अजित सरकार हत्येप्रकरणी त्यांनी 17 वर्षे तुरुंगवास भोगला आहे.

Pappu Yadav | Sarkarnama

राजकीय कारकीर्द -

पाच वेळा खासदार आणि चार वेळा आमदार राहिलेले पप्पू यादव हे एकेकाळी लालू यादव यांचे आवडते आणि मर्जीतले नेते होते.

Pappu Yadav | Sarkarnama

न्यायालयाने दोषी ठरवले -

सीपीएम नेते अजित सरकार यांच्या हत्येप्रकरणी पाटणा उच्च न्यायालयाने त्यांना 2009 मध्ये दोषी ठरवले होते.

Pappu Yadav | Sarkarnama

निवडणूक लढवण्यावर बंदी -

शिक्षेनंतर त्यांना 2 एप्रिल 2009 रोजी निवडणूक लढविण्यावर बंदी आली. पप्पू यादव यांनी 1990 मध्ये पहिल्यांदा विधानसभा निवडणूक जिंकली होती. यानंतर पाच वेळा लोकसभा जिंकली आणि पहिल्या तीन टर्मसाठी अपक्ष खासदार बनले.

Pappu Yadav | Sarkarnama

न्यायालयीन दिलासा -

2013 मध्ये पाटणा उच्च न्यायालयाकडून दिलासा मिळाल्यावर पप्पू यादव यांनी पुन्हा 2014 ची निवडणूक आरजेडीच्या तिकिटावर लढवली आणि जिंकली.

Pappu Yadav | Sarkarnama

स्वत:चा पक्ष -

तेजस्वी यादव यांच्याशी मतभेद झाल्यानंतर त्यांनी 2015 मध्ये स्वत:चा पक्ष स्थापन केला. मात्र, त्यांना निवडणुकीत पराभव पत्करावा लागला. त्यांना वास्तवाची जाणीव झाल्यानंतर ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत.

R

Pappu Yadav | Sarkarnama

NEXT : बिहारच्या राजकारणातला 'लंबी रेस का घोडा', चिराग पासवान यांची संपत्ती किती कोटी माहितीय?

क्लिक करा...