Ganesh Sonawane
अंतराळात गेल्यानंतर अंतराळवीरांना सर्वात मोठा धोका असतो तो आरोग्याचा, अंतराळात गेल्यानंतर त्यांच्या शरीरात अनेक बदल होतात.
अंतराळात गुरुत्वाकर्षण नसते. त्यामुळे व्यक्ती तरंगत असते. त्यामुळे शरीरातील द्रवांमध्ये असंतुलन होते. सुक्ष्म गुरुत्वाकर्षणामध्ये शरीरातील द्रव वरच्या दिशेने जातात. यामुळे आपल्या शरीराच्या फिल्टर सिस्टिमला अर्थात किडनीला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते.
फ्लूइड इंबैलेंसमुळे अनेक गंभीर परिणाम होतात. यात शरीरात असलेली द्वव पातळी वरच्या दिशेने जाते, त्यामुळे चेहऱ्यावर सूज येते.
किडनी योग्य द्रव संतुलन राखण्यासाठी संघर्ष करतात. ज्यामुळे डीहायड्रेशन किंवा द्रव ओव्हरलोड होण्याची शक्यता असते.
मायक्रोग्रॅव्हिटीमुळे हाडांमध्ये कॅल्शियमचे वाढलेले उत्सर्जन मुतखड्याचा धोका निर्माण करते.
फ्लूइड इंम्बॅलेंस हे ह्रदयावरही परिणाम करते.
अशा परिस्थिती अंतराळवीर जेव्हा पृथ्वीवर परतात तेव्हा त्यांना चक्कर येते.
कर्करोग आणि गंभीर आजाराचा धोका देखील वाढतो.
अंतराळातून पृथ्वीवर परत आल्यानंतर आंतराळवीरांचे वजन कमी झालेले असते.