Rashmi Mane
वर्ष सुरू होताच, सर्व राज्य मंडळांच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू होतात. या परीक्षांमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्याची स्थिती व दिशा ठरते.
मुलांच्या मनात परीक्षेबाबत तणाव, भीती आणि प्रचंड अस्वस्थता असते, त्यावर मात करण्यासाठी मंत्रालयाकडून दरवर्षी परीक्षेबाबत चर्चा केली जाते.
दरवर्षी भारत सरकार 'परीक्षा पे चर्चा' हा कार्यक्रम आयोजित करते.
आज (29 जानेवारी) ला भारत मंडपम, नवी दिल्ली येथे सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम सुरू झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलांच्या प्रश्नांचे निरसण केले.
मोदींनी देशातील लाखो विद्यार्थ्यांना परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी अनेक टिप्स आणि सूचना दिल्या.
मोदींनी केवळ विद्यार्थ्यांशीच नाही तर शिक्षक आणि पालकांशीही संवाद साधला.