Rajanand More
झारखंडमधील राज्यसभेच्या निवडणुकीत परिमल नाथवानी हे अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. त्यांना भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएने पाठिंबा दिला होता.
नाथवानी यांचा हा राज्यसभा निवडणुकीतील हा सलग चौथा विजय आहे. २००८, २०१४, २०२० आणि २०२६ असे चारही वेळा त्यांनी अपक्ष म्हणूनच निवडणूक लढविली होती.
२००८ ची पहिली, दुसरी आणि चौथी निवडणूक त्यांनी झारखंडमधून तर तिसरी निवडणूक आंध्र प्रदेशातून लढविली होती. एकही निवडणूक ते हरले नाहीत.
नाथवानी हे कोणत्या राजकीय पक्षाचे सदस्य नाहीत. ते मुळचे गुजरातचे आहेत. १९९० च्या दशकात त्यांनी काही छोट्या उद्योगातून या क्षेत्रात जम बसविण्यास सुरूवात केली होती.
१९९७ पासून नाथवानी यांचा रिलायन्सशी संबंध आला. सध्या ते रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडमध्ये कॉप्रोरेट व्यवहार विभागाचे संचालक आहेत. मुकेश अंबानी आणि त्यांचे अत्यंत निकटचे संबंध असल्याचे सांगितले जाते.
नाथवानी यांना क्रिकेटची आवड असून ते गुजरात क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष होते. अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडिअमच्या पुनर्निमाण कामातही त्यांचे योगदान होते.
२००८ पासून राज्यसभेचे सदस्य आहेत. २०२६ च्या निवडणुकीत त्यांनी इंडिया आघाडीचे आमदार फोडत विजय मिळविला. त्यामुळे या विजयाला महत्व प्राप्त झाले आहे.
अपक्ष उमेदवार म्हणून सलग चारवेळी दोन वेगळ्या राज्यांतून राज्यसभेवर निवडून जाण्याचा विक्रम त्यांनी केला आहे. त्यामुळे त्यांच्या विजयाची देशाच्या राजकारणात चर्चा होत आहे.