Parliament Attack 2001 Story : संसदेवरील हल्ल्याचा तो भीषण दिवस! 45 मिनिटे चालला होता थरार...

Rashmi Mane

दिवस होता 13 डिसेंबर, संसदेत हिवाळी अधिवेशन सुरु होते. संसदेत विरोधकांच्या गदारोळात अधिवेशन गाजत होते.

2001 Parliament Attack | Sarkarnama

संसद भवनात 100 हून अधिक व्हीआयपी उपस्थित होते. सभागृहाच्या बाहेर नेते, पत्रकार होते, सगळं रोजच्यासारखं सुरू होतं.

2001 Parliament Attack | Sarkarnama

सकाळी 11 वाजून 28 मिनिटांनी एक पांढरी अ‍ॅम्बेसडर गाडी संसद भवन परिसरात गेट क्रमांक 12 मध्ये आली. गृह मंत्रालयाचे बनावट स्टिकर असलेली गाडी संसद भवनात घुसली.

2001 Parliament Attack | Sarkarnama

कारच्या वरती लाल दिवा लावण्यात आला होता. संसद भवनात आल्यानंतर गाड्यांची स्पीड कमी असते. पण या गाडीची स्पीड जास्त होता. त्यामुळे संसद भवनात सुरक्षेसाठी तैनात सुरक्षारक्षक जगदीश यादव यांना शंका आली.

2001 Parliament Attack | Sarkarnama

जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तैयबाचे पाच दहशतवादी आत बसले होते. मुख्य इमारतीकडे जात असताना दहशतवाद्यांचे वाहन चुकून उपराष्ट्रपतींच्या ताफ्यासमोर आले.

2001 Parliament Attack | Sarkarnama

घाबरलेल्या स्थितीत त्यांची कार ताफ्यातून प्रवास करणाऱ्या सुरक्षा वाहनाला धडकली. दहशतवादी बाहेर आले आणि त्यांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला.

2001 Parliament Attack | Sarkarnama

त्या पांढऱ्या ॲम्बेसेडर कारमध्ये एके-४७ रायफल, ग्रेनेड लाँचर, पिस्तूल आणि हँडगनचा साठा होता. पाच जण बाहेर येताच त्यांनी गोळ्या झाडायला सुरुवात केली.

2001 Parliament Attack | Sarkarnama

या हल्ल्यात सुरक्षा कर्मचाऱ्यांसह नऊ जण ठार झाले होते, तर 18 जण जखमी झाले होते. सुदैवाने एकही खासदार या दहशतवाद्यांचे लक्ष्य झाला नाही.

2001 Parliament Attack | Sarkarnama

जवळजवळ 45 मिनिटे दहशतवादी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांमध्ये हा गोळीबार सुरु होता. या हल्ल्यात दिल्ली पोलिसांचे पाच जवान, केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलाची एक महिला सुरक्षारक्षक, राज्यसभा सचिवालयाचे दोन कर्मचारी आणि एका माळी यांचा मृत्यू झाला होता.

2001 Parliament Attack | Sarkarnama

Next : भाजप खासदार ज्योतिरादित्य शिंदे यांचं शिक्षण किती?

येथे क्लिक करा