Jagdish Patil
केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत 'एक देश-एक निवडणूक' विधेयकाला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे.
17 डिसेंबर रोजी हे विधेयक लोकसभेत सादर केले जाणार आहे. यासाठी भाजपने सर्व खासदारांना उपस्थित राहण्याचा व्हीप जारी केला आहे.
PM नरेंद्र मोदी आग्रही असलेले ‘एक देश एक निवडणूक’ विधेयक नेमकं काय आहे ते जाणून घेऊया.
'एक देश, एक निवडणूक' म्हणजे देशातील लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका एकाच वेळी घेतल्या जातीलं.
यामुळे मतदारांना एकाच वेळी दोन्ही निवडणुकांसाठी मतदान करता येणार आहे.
सर्व निवडणुका एकत्रित घेतल्याने निवडणुकांवर होणारा भरमसाठ खर्च कमी होऊ शकतो.
केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या योजनांमध्ये सातत्य ठेवण्यासाठी एकत्र निवडणुकीचा फायदा होऊ शकतो.
शासकीय कर्मचाऱ्यांवर निवडणूक प्रक्रियेचा मोठा ताण असतो, मात्र, 'एक देश, एक निवडणूक' पद्धतीमुळे तो कमी होईल.
लॉ कमिशनच्या रिपोर्टनुसार या निवडणूक प्रक्रियेमुळे मतदानाचा टक्का वाढू शकतो. कारण लोकांना एकाच वेळी मतदान करणं सोयीचं ठरू शकतं.