Roshan More
पार्थ पवार यांना देशाचे उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन जी यांनी त्यांना खासदारकीची शपथ दिली.
पार्थ पवार यांनी शपथ घेत असताना अजित पवारांची आठवणी जपली.
अजितदादा जे गुलाबी जॅकेट घालायचे तसे जॅकेट पार्थ यांनी शपथविधीच्या वेळी परिधान केले होते.
पार्थ पवारांनी राज्यसभेत घेतली शपथ, अजितदादांची आठवण जपलीराष्ट्रवादी काँग्रेस परिवारासाठी आजचा दिवस अत्यंत अभिमानाचा आहे, असे सुनेत्रा पवार यांनी म्हटले.
सुनेत्रा पवार म्हणाल्या, पार्थ अजितदादा पवार यांनी राज्यसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेत लोकसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात केली.
लोकहित, विकास आणि जनकल्याण यांना केंद्रस्थानी ठेवून ते संसदेत प्रभावीपणे कार्य करतील, असा विश्वास सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केला.
NEXT : सुनेत्रा पवारांच्या विरोधात उमेदवारी दाखल करणाऱ्या करुणा मुंडेंची संपत्ती किती?