Pradeep Pendhare
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनिमित्त राज्यातील वातावरण ढवळून निघालं आहे.
महायुती अन् महाविकास आघाडीमध्ये उमेदवार निश्चित करताना, उमेदवार पळवापळवीपर्यंतचे राजकारण सुरू आहे.
उमेदवार निश्चित करताना पक्षाकडून एबी फाॅर्म दिला जात असून, त्याच्या नियमाची चर्चा सुरू आहे.
एबी फाॅर्म म्हणजे, हा फॉर्म मिळालेला उमेदवार त्या पक्षाचा अधिकृत उमेदवाराचा दर्जा मिळतो.
एबी फॉर्मशिवाय कोणत्याही उमेदवाराला पक्षाचं चिन्ह निवडणुकीत वापरता येत नाही.
एबी फॉर्म मिळालेला उमेदवार "अधिकृत" ठरतो, तर फॉर्म न मिळालेली व्यक्ती बंडखोर मानली जाते.
निवडणूक आयोग फक्त एबी फॉर्मवर आधारित उमेदवाराला पक्षाची ओळख देतो.
सीट शेअरिंगमध्ये कोणत्या पक्षाकडून कोणाला अधिकृत तिकीट दिलंय हे एबी फॉर्ममुळे स्पष्ट होतं.
एबी फॉर्म म्हणजे पक्षाकडून दिलेला अंतिम आणि सर्वात महत्त्वाचा तिकीट दस्तऐवज. यामुळे उमेदवाराची अधिकृतता, चिन्हाचा हक्क आणि पक्षाची मान्यता निश्चित होते.