Ganesh Sonawane
राजकारणात कोणी फार काळ कोणाचा मित्र नसतो आणि कोणीही फार काळ कोणाचा शत्रू नसतो हे आपण कायम ऐकत आलो आहोत आणि अनुभवत देखील आलो आहोत.
गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात शड्डू ठोकून उभे राहणारे नाशिकच्या राजकारणातले राजकीय शत्रू पुन्हा एकत्र आले आहेत.
पक्षांतरामुळे ही किमया घडली असून एकेकाळचे विरोधक आता एकाच व्यासपीठावर एकत्र दिसत आहे. त्यांच्यातील मैत्रीचे बंध पुन्हा घट्ट झाले आहे.
विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार अॅड. राहुल ढिकले आणि गणेश गिते एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढले, त्यांच्यात शत्रुत्व झाले. मात्र पराभवानंतर गणेश गिते आता पुन्हा भाजपात आल्यानंतर आता दोघे पुन्हा एकत्र आले आहेत.
लोकसभेला शिवसेना (शिंदे गट) खासदार हेमंत गोडसे यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याची तयारी शिवसेना (उद्धव ठाकरे गट)चे विजय करंजकर यांनी केली होती. मात्र उमेदवारी नाकारल्यानंतर विजय करंजकर यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला व गोडसेंच्या प्रचारात सहभाग घेतला व त्यांना साथ दिली.
सुधाकर बडगुजर आणि भाजपाचे मुकेश शहाणे यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे. बडगुजर यांना शहाणे यांच्या विरोधात महापालिका निवडणुकीसाठी उभे करायचे होते, त्यावरुन काही वर्षांपूर्वी वाद झाला होता. मात्र आता बडगुजर हे भाजपात आल्याने त्यांच्यातील संघर्ष संपल्याची चिन्हे आहे.
भाजप आमदार सीमा हिरे यांच्या विरोधात डॉ. अपूर्व हिरे यांनी एकदा विधानसभा निवडणूक लढवली होती. त्यामुळे दोघांमध्ये राजकीय स्पर्धा चांगलीच होती. आता आमदार सीमा हिरे यांनीच अपूर्व हिरेंना भाजपात आणलं आहे. आता दोन हिरे कुटुंब एकत्र आलेले दिसतात.
तर, पक्षांतर झाले. एकाच पक्षात आले तरी अद्याप त्यांच्यातील दुश्मनी कायम आहे. असे आहेत- सुधाकर बडगुजर व सीमा हिरे. जे एकमेकांचे कट्टर विरोधक आहे.