Jagdish Patil
काँग्रेस नेते आणि माजी मंत्री पतंगराव कदम यांचा आज जन्मदिवस आहे.
एकेकाळी गावात शाळा नसल्याने पतंगराव कदम यांना दुसऱ्या गावातील शाळेत जाण्यासाठी त्यांना दररोज 5 किलोमीटर चालत जावं लागायचं.
मात्र, एक दिवस याच गरीब शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या कदम यांनी देशासह परदेशातही शिक्षण संस्थाचं जाळ निर्माण केलं.
सांगलीतील सोनसळ या गावात पतंगराव कदम यांचा जन्म झाला. कुंडलमध्ये त्यांनी मॅट्रिकपर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं.
त्यानंतर कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या रयत शिक्षण संस्थेत त्यांनी प्रवेश घेत 'कमवा आणि शिका' योजनेअंतर्गत त्यांनी शिक्षण पूर्ण केलं.
तर रयत संस्थेच्या एका हायस्कूलमध्ये अर्धवेळ शिक्षक म्हणून नोकरी करत त्यांनी पुणे विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली.
1964 मध्ये त्यांनी भारती विद्यापीठाची स्थापना केली. सध्या भारती संस्थेची प्राथमिक ते पदव्युत्तर; वैद्यकीय, अभियांत्रिकी अशा विविध क्षेत्रांतील अभ्यासक्रम शिकवणारी180 शाळा-कॉलेजेस आहेत.
शिक्षणासह सहकार क्षेत्रातही त्यांनी अनेक संस्थांची स्थापना केली. भारती सहकारी बँक, सोनहिरा सरकारी साखर काररखाना, सूत गिरणी, कुक्कुटपालन संघाची स्थापनाही त्यांनी केली.