तीन विवाह अन् घटस्फोट; मातब्बर नेत्याच्या वैयक्तिक आयुष्यात उलथापालथ

Rajanand More

पवन कल्याण

आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री आणि प्रसिद्ध अभिनेते पवन कल्याण यांच्या वैयक्तिक आयुष्यात सातत्याने मोठी उलथापालथ होत आहे. त्यांचा तिसरा विवाहही टिकू शकलेला नाही.

Pawan Kalyan | Sarkarnama

घटस्फोट

पवन कल्याण आणि त्यांची तिसरी पत्नी अ‍ॅना कोनिडेला यांनी सोमवारी विभक्त होण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांच्या १३ वर्षांच्या वैवाहिक आयुष्याचा शेवट झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Pawan Kalyan and Anna. | Sarkarnama

निर्णय संमतीने

दोघांनी परस्पर संमतीने विभक्त होण्याचा निर्णय घेतल्याचे पवन कल्याण यांच्या उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे.

Pawan Kalyan and Anna. | Sarkarnama

कोण आहेत अ‍ॅना कोनिडेला?

अ‍ॅना या मूळच्या रशियाच्या रहिवासी आहेत. त्या मॉडेल आणि अभिनेत्री होत्या. २०११ मध्ये तेलुगू चित्रपट 'तीन मार'च्या चित्रीकरणादरम्यान दोघांची भेट झाली होती. त्यानंतर दोन वर्षांनी त्यांनी विवाह केला.

Pawan Kalyan and Anna. | Sarkarnama

दोन मुले

पवन कल्याण आणि अ‍ॅना या दाम्पत्याला पोलेना अंजना पवनोव्हा आणि मार्क शंकर पवनोविच अशी दोन मुले आहेत.

Pawan Kalyan with family | Sarkarnama

पहिला विवाह

अ‍ॅना यांच्याशी झालेला विवाह पवन कल्याण यांचा तिसरा विवाह होता. यापूर्वी त्यांनी १९९७ मध्ये नंदिनी यांच्याशी लग्न केले होते. मात्र, हे नाते फार काळ टिकले नाही.

Pawan Kalyan, Nandini | Sarkarnama

दुसरा विवाह

२००९ मध्ये पवन कल्याण यांनी अभिनेत्री आणि मॉडेल रेणू देसाई यांच्याशी विवाह केला. २०१२ मध्ये दोघे विभक्त झाले. त्यांना अकिरा नंदन आणि आध्या अशी दोन मुले आहेत.

Pawan Kalyan, Renu Desai | Sarkarnama

अभिनय ते राजकारण

पवन कल्याण हे अभिनेते चिरंजीवी आणि नागेंद्र बाबू यांचे धाकटे भाऊ आहेत. १९९६ मध्ये 'अक्कडा अम्मायी इक्कडा अब्बायी' या चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पुढे त्यांनी राजकारणात प्रवेश करत राजकीय पक्ष स्थापन केला.

Pawan Kalyan | Sarkarnama

NEXT : 'लेडी सिंघम'ची होणार राजकारणात एन्ट्री? नेटकऱ्यांनी मंत्र्यांचं खातंही ठरवलं...

येथे क्लिक करा.