Rashmi Mane
पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांचे 2016 मध्ये करण्यात आलेल्या नोटाबंदीमुळे नशीब उजळले.
विजय शेखर शर्मा यांनी 2010 मध्ये पेटीएम लॉन्च केले.
शर्मा हे मूळचे अलिगढचे आहेत. त्यांचे वडील शाळेत शिक्षक होते.
कठोर परिश्रमाने त्याने प्रतिष्ठित दिल्ली टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी (DTU) मध्ये प्रवेश मिळवला.
युनिव्हर्सिटीमध्ये शिकत असताना त्यांनी indiasite.net ही वेबसाइट तयार केली.
विजय शेखर शर्मा यांनी आपल्या मेहनतीने आणि मित्रांच्या मदतीने इंग्रजीवर पकड मिळवली.
प्रतिष्ठित स्टॅनफोर्ड यूनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेण्याचे स्वप्नही त्यांनी पाहिले, परंतु आर्थिक अडचणींमुळे ते होऊ शकले नाही.
शर्मा यांनी पेटीएम 2010 मध्ये लॉन्च केले. डिजिटल पेमेंटमुळे ॲपला देशभरात लोकप्रियता मिळाली. 2016 मध्ये लागू करण्यात आलेल्या नोटाबंदीने या ॲपचे भाग्य वाढवले.