विद्यार्थ्यांना जखमी केलेल्या 'पॅलेट गन' वापरण्याचे नियम काय आहेत?

Jagdish Patil

सुनावणी

दिल्लीत CJP च्या आंदोलनादरम्यान कथित मेटॅलिक पॅलेट गन वापरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली.

Pellet Gun SOP India | Sarkarnama

याचिका

IB चे माजी विशेष संचालक आणि पॅलेट गनमुळे जखमी झालेल्या दोन आंदोलनकर्त्यांनी याचिका दाखल केली आहे.

Pellet Gun SOP India

पॅलेट गन

सर्वोच्च न्यायालयाने सरकारला या गनच्या वापराबाबतचे स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसीजर (SOP) काय आहे, याची माहिती मागितली.

Pellet Gun SOP India

SOP

याच पार्श्वभूमीवर पॅलेट गनच्या वापराबाबतचे SOP काय आहेत ते जाणून घेऊया.

Pellet Gun SOP India | Sarkarnama

सार्वजनिक

भारतात पॅलेट गन वापरण्याबाबात एकच सार्वजनिक आणि सर्व राज्यांसाठी लागू असणारा SOP उपलब्ध नाही.

Pellet Gun SOP India | Sarkarnama

गृह मंत्रालय

मात्र केंद्रीय गृह मंत्रालय, CRPF, RAF आणि संबंधित राज्य पोलीस दलांच्या अंतर्गत SOP, तसेच कायदेशीर तत्त्वांनुसार त्याचा वापर केला जातो.

Pellet Gun SOP India

शेवटचा पर्याय

या गनचा वापर फक्त इतर कमी-घातक उपाय (समजावणे, बॅरिकेड, लाठीचार्ज, अश्रुधूर इ.) निष्फळ ठरल्यास केला जातो.

Pellet Gun SOP India | Sarkarnama

आदेश

परिस्थितीनुसार घटनास्थळी प्रभारी वरिष्ठ पोलीस किंवा सुरक्षा अधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच वापर केला जातो.

Pellet Gun SOP India

परिस्थिती

जमाव हिंसक झाल्यास, दगडफेक, प्राणघातक हल्ला किंवा सुरक्षा दलांच्या जीवाला गंभीर धोका निर्माण झाल्यानंतरच परवानगी.

Pellet Gun SOP India | Sarkarnama

प्रशिक्षण

SOP नुसार डोके, चेहरा किंवा छातीवर फायर न करता, कंबरेखालील भागावर फायर करण्याचे निर्देश असतात. कमी-घातक शस्त्रांच्या वापरासाठी विशेष प्रशिक्षण दिले जाते.

Pellet Gun SOP India | Sarkarnama

अंतर

पॅलेट गनचा वापर ठराविक अंतरावरूनच (५०० मीटर किंवा त्याहून अधिक) करणं गजरेचं असतं. जवळून फायर केल्यास ते प्राणघातक ठरू शकते.

Pellet Gun SOP India | Sarkarnama

NEXT : मॉडेलिंग ते खासदार व्हाया बॉलिवूड! Gen Z ला गटरछाप म्हणणाऱ्या कंगना रनौतची हिस्ट्री काय?

Kangana Ranaut Biography
क्लिक करा