Ganesh Sonawane
नाशिक जिल्ह्यातील निवृत्तीवेतनधारक आणि कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी 2 ते 30 नोव्हेंबर 2026 या कालावधीत विशेष अभियान राबविण्यात येत आहे.
डिजिटल हयातीचा दाखला घरबसल्या सादर करता येणार आहे. त्यामुळे कोषागार कार्यालयात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नाही.
निवृत्तीवेतनधारकांना Jeevan Pramaan Portal या अधिकृत संकेतस्थळावरून डिजिटल हयातीचा दाखला सादर करता येईल.
Jeevan Pramaan Face App आणि Aadhaar Face RD या दोन ॲपच्या मदतीने स्मार्टफोनवरून डिजिटल हयातीचा दाखला सादर करता येईल.
मोबाईल ॲपच्या माध्यमातून Face Authentication म्हणजेच चेहरा प्रमाणीकरण करून डिजिटल हयातीचा दाखला तयार करता येईल.
दाखला सादर करण्यासाठी आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक, PPO क्रमांक आणि आवश्यक निवृत्तीवेतनविषयक माहिती जवळ असणे आवश्यक आहे.
प्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर डिजिटल हयातीचा दाखला तयार होतो. त्यानंतर मिळणारा Pramaan ID भविष्यातील संदर्भासाठी जतन करून ठेवावा.
डिजिटल दाखला सादर करताना अडचण आल्यास संबंधित बँक शाखा किंवा कोषागार कार्यालयातील निवृत्तीवेतन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी सचिन धस यांनी केले आहे.