सरकारनामा ब्यूरो
भारत हा अनेक धर्म, संस्कृती आणि परंपरेने नटलेला देश आहे. भारतात एकूण 28 राज्ये आणि 8 केंद्रशासित प्रदेश आहेत.
28 राज्याचा देश असलेल्या भारतात असं कोणतं राज्य आहे जेथील लोक खूप आनंदी असतात, हे पाहूयात.
2023 मध्ये करण्यात आलेल्या अभ्यासानुसार, भारतातील मिझोराम राज्य हे खूप आनंदी आणि उत्साह असलेले राज्य आहे.
2013 ला गुरुग्राम येथील व्यवस्थापन विकास संस्थेतील रणनीतीचे प्राध्यापक राजेश के पिलानिया यांनी एक अहवाल सादर केला होता.
अहवालात 6 अशा गोष्टी आहेत, ज्यामुळे मिझोरामला आनंदी राज्य म्हणून घोषित करण्यात आले आहे त्या कोणत्या जाणून घेऊयात...
या अहवालात मिझोरामच्या जनतेचा साक्षरता दर, कौटुंबिक संबंध, सामाजिक समस्या, धर्म, शारीरिक आणि मानसिक आरोग्य अशा सगळ्या गोष्टीवरून या राज्याला हा दर्जा देण्यात आला आहे.
अहवालानुसार,मिझोरमने 2023 ला 100 टक्के साक्षरतेचा दर गाठला आहे. येथील मुले लहान वयातच त्यांचे शिक्षण आणि खर्चाची जबाबदारी घेतात.
ईशान्य प्रदेश विकास मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, 2011 च्या जनगणनेनुसार मिझोरामची लोकसंख्या 10 लाख 91 हजार 14 होती.