Kangana Ranaut : खासदारकी धोक्यात, उच्च न्यायालयाची नोटीस

Pradeep Pendhare

दिमाखात लोकसभेत एन्ट्री

भाजपच्या कंगना राणावत यांनी काँग्रेसचे दिग्गज नेते विक्रमादित्य सिंह यांचा पराभव करत लोकसभेत एन्ट्री मिळवली.

Kangana Ranaut | Sarkarnama

कंगनाचा मोठा विजय

कंगना राणावत यांना विक्रमादित्य सिंह यांचा 74 हजार 755 मतांनी पराभव केला. कंगना यांना 5 लाख 37 हजार 2 मते मिळाली होती.

Kangana Ranaut | Sarkarnama

खासदारकीविरोधात याचिका

लायन राम नेगी यांनी कंगना राणावतविरोधात हिमाचलच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल करत निवड रद्द करण्याची मागणी केली.

Kangana Ranaut | Sarkarnama

याचिका यांनी दाखल केली

लायन राम नेगी वन विभागाच्या नोकरीतून निवृत्ती घेत अपक्ष निवडणूक लढवत होते. परंतु निवडणूक अधिकाऱ्यांनी चुकीच्या पद्धतीने आपला अर्ज रद्द केल्याचा आरोप त्यांनी याचिकेद्वारे केला आहे.

Kangana Ranaut | Sarkarnama

निवडणूक यंत्रणेवर आक्षेप

निवडणूक अधिकाऱ्यांना संबंधित संपूर्ण कागदपत्र सोपवली, तेव्हा ती घेण्यास नकार दिला आणि माझा अर्ज रद्द केल्याचा आरोप करत निवडणूक रद्द करण्याची मागणी याचिकर्त्यांनी केली.

Kangana Ranaut | Sarkarnama

अधिनियम काय सांगतो

लोकप्रतिनिधी अधिनियम कलम 100 अंतर्गत मंडी मतदारसंघातून निवडून आलेल्या खासदार कंगना राणावत यांची खासदारकी रद्द होऊ शकते.

Kangana Ranaut | Sarkarnama

तर निर्णय होऊ शकतो

याचिकाकर्त्यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज बेकायदेशिररित्या रद्द झाला हे सिद्ध करून दाखवल्यास न्यायालय हा निर्णय देऊ शकते.

Kangana Ranaut | Sarkarnama

कंगनाला नोटीस बजावली

हिमाचलच्या उच्च न्यायालयाने लायन राम नेगी यांच्या याचिकेची दखल घेत कंगना राणावत यांना नोटीस बजावत मुदतीमध्ये म्हणणं सादर करण्याच्या आदेश दिलाय.

Kangana Ranaut | Sarkarnama

म्हणणे सादर होणार

21 ऑगस्टपर्यंत कंगना राणावत यांना नोटिसीवर उत्तर देण्याचा आदेश उच्च न्यायालयाने केला आहे.

Kangana Ranaut | Sarkarnama

NEXT : पुण्यात 'कोसळधार'...अजित पवार अलर्ट मोडवर....

येथे क्लिक करा :