Sanjeev Sanyal : अर्थमंत्रिपदासाठी रेसमध्ये असलेले संजीव सन्याल कोण? PM मोदींचे सल्लागार नंदीग्राममधून निवडणूक लढविणार?

Rajanand More

अर्थमंत्रिपदासाठी रेस

पश्चिम बंगालमध्ये पहिल्यांदाच भाजपची सत्ता आली आहे. सुवेंदू अधिकारी यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा कार्यभार हाती घेतल्यानंतर आता मंत्रिमंडळातील प्रमुख अर्थमंत्रिपद कुणाकडे जाणार, याची चर्चा सुरू झाली आहे.

PM Modi | sarkarnama

संजीव सन्याल

अर्थतज्ज्ञ संजीव सन्याल यांची नावाची जोरदार चर्चा आहे. ते मुळचे बंगालमधील असल्याने त्यांच्या नावाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाही हिरवा कंदील असल्याच्या चर्चा समाजमाध्यमांवर सुरू आहेत.

Sanjeev Sanyal | Sarkarnama

निवडणूक लढणार?

सुवेंदू अधिकारी यांनी नंदीग्राम विधानसभा मतदारसंघातून पदाचा राजीनामा दिला आहे. या जागेवरून सन्याल हे निवडणूक लढवून विधानसभेत दाखल होऊ शकतात, अशीही चर्चा आहे.

Sanjeev Sanyal | Sarkarnama

आर्थिक सल्लागार

सन्याल हे पंतप्रधान मोदी यांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे (EAC-PM) सदस्य आहेत. २०२२ मध्ये ते या परिषदेत सदस्य आहेत. त्यामुळे त्यांच्या नावाला महत्व प्राप्त झाले आहे.

Sanjeev Sanyal | Sarkarnama

कुलपती

पुण्यातील नामांकित गोखले इन्स्टिट्युट ऑफ पॉलिटिक्स अॅन्ड इकॉनॉमिक्स या संस्थेचे ते कुलपतीही आहेत. ते वृत्तपत्रांमध्ये स्तंभलेखनही करतात.

Sanjeev Sanyal | Sarkarnama

आर्थिक सर्वेक्षण

PM मोदींच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे सदस्य म्हणून काम करताना सन्याल यांनी देशाच्या आर्थिक सर्वेक्षणाचे सहा अहवाल तयार करण्यात महत्वपूर्ण योगदान दिले आहे.

Sanjeev Sanyal | Sarkarnama

प्रतिष्ठित कुटुंब

संजीव सन्याल यांचं वय सध्या ५५ वर्षे असून ते बंगालमधील एका प्रतिष्ठित कुटुंबाचे सदस्य आहेत. त्यामुळे बंगालच्या अर्थमंत्रिपदासाठी त्यांच्या नावाचा विचार सुरू असल्याचे समजते.

Sanjeev Sanyal | Sarkarnama

मोदींची गॅरंटी

बंगाल विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पंतप्रधान मोदींनी राज्याला पुन्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचे आश्वासन दिले आहे. या आश्वासनाची पुर्तता करण्यासाठी सन्याल यांना मैदानात उतरविले जाऊ शकते.

Sanjeev Sanyal | Sarkarnama

NEXT : देशाच्या राजकारणात इतिहास घडविला; पक्षाच्या पहिल्या महिला आमदार...

येथे क्लिक करा.