PF Withdrawal From ATM : 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येतील पीएफचे पैसे, जाणून घ्या लेटेस्ट अपडेट!

Rashmi Mane

पीएफ खाते

नोकरी करणाऱ्या बहुतांश लोकांचे पीएफ खाते असते. या खात्यात प्रत्येक महिन्याला पगाराचा ठराविक रक्कम जमा होते आणि त्याचप्रमाणे कंपनीकडूनही रक्कम जमा केली जाते.

PF Withdrawal From ATM | Sarkarnama

सेव्हिंग अकाऊंट

त्यामुळे हा निधी एक प्रकारचा सेव्हिंग अकाऊंटसारखाच मानला जातो. या खात्यावर व्याजदेखील मिळते.

PF Withdrawal From ATM | Sarkarnama

ऑनलाईन क्लेम

मात्र पीएफमधील पैसे काढण्यासाठी आतापर्यंत ऑनलाईन क्लेम करावा लागत होता. आणि त्याची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी 4-5 दिवस लागायचे.

PF Withdrawal From ATM | Sarkarnama

मोठा बदल होणार

पण आता कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) आपल्या सभासदांसाठी मोठा बदल करण्याच्या तयारीत आहे.

PF Withdrawal From ATM | Sarkarnama

नवी सुविधा मिळणार

लवकरच पीएफमधील पैसे थेट एटीएममधून काढण्याची सुविधा मिळणार आहे. ही नवी सुविधा EPFO 3.0 उपक्रमाचा एक महत्त्वाचा भाग असेल.

PF Withdrawal From ATM | Sarkarnama

लगेच काढता येईल रक्कम

याबाबतची अंतिम घोषणा सेंट्रल बोर्ड ऑफ ट्रस्टीजच्या पुढील बैठकीत होणार आहे. मंजुरी मिळाल्यानंतर ही योजना अमलात आणली जाईल. त्यामुळे सदस्यांना पैशांसाठी अनेक दिवस वाट पाहावी लागणार नाही, तर क्लेम मंजूर झाल्यानंतर लगेचच एटीएममधून रक्कम काढता येईल.

PF Withdrawal From ATM | Sarkarnama

स्पेशल एटीएम कार्ड

EPFO आपल्या सदस्यांना स्पेशल एटीएम कार्ड देऊ शकते. हे कार्ड थेट पीएफ खात्याशी लिंक केलेले असेल. हे कार्ड वापरून कुठल्याही एटीएममधून पैसे काढू शकतील.

PF Withdrawal From ATM | Sarkarnama

प्रक्रिया सोपी होणार

या निर्णयाचा फायदा देशातील जवळपास 7.8 कोटी सभासदांना होणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत कर्मचारी त्वरित पैसे मिळवू शकतील. आतापर्यंत पीएफची रक्कम येण्यास काही दिवस लागत असल्याने अडचणी निर्माण होत होत्या. मात्र या नव्या योजनेमुळे ही प्रक्रिया सोपी होणार आहे.

PF Withdrawal From ATM | Sarkarnama

Next : मोदी सरकारने अटक केलेल्या सोनम वांगचूक यांच्या पत्नीचे महाराष्ट्र कनेक्शन 

येथे क्लिक करा