PF withdrawal Update : ATM मधून 'या' महिन्यापासून काढता येणार PF चे पैसे; समोर आली महत्त्वाची अपडेट

Rashmi Mane

मोठी बातमी PF खातेदारांसाठी

पीएफ खातेधारकांसाठी दिलासादायक अपडेट समोर आली आहे. आता पैसे काढण्यासाठी लागणारा वेळ आणि किचकट प्रक्रिया लवकरच इतिहासजमा होणार आहे.

PF Withdraw via ATM | Sarkarnama

PF काढण्याची योजना

केंद्र सरकार मार्च 2026 पासून पीएफची रक्कम थेट एटीएम आणि यूपीआयद्वारे काढण्याची सुविधा सुरू करू शकते.

PF Withdraw via ATM | Sarkarnama

केंद्रीय मंत्र्यांचा मोठा दावा

केंद्रीय श्रममंत्री मनसुख मांडवीय यांनी स्पष्ट केलं आहे की मार्च 2026 आधी ही सुविधा लागू करण्याचा मंत्रालयाचा प्रयत्न आहे. या नव्या योजनेमुळे पीएफ काढण्याची प्रक्रिया अधिक वेगवान आणि सोपी होईल.

PF Withdraw via ATM | Sarkarnama

किती रक्कम काढता येणार?

सध्याच्या नियमानुसार पीएफ खातेधारकांना त्यांच्या खात्यातील 75 टक्क्यांपर्यंत रक्कम काढण्याची परवानगी आहे. हीच रक्कम भविष्यात एटीएम किंवा यूपीआयच्या माध्यमातून सहज काढता येणार आहे.

PF Withdraw via ATM | Sarkarnama

ऑनलाइन क्लेमचा त्रास संपणार

आत्तापर्यंत पीएफ काढण्यासाठी ऑनलाईन पोर्टल, विविध फॉर्म आणि एम्प्लॉयरची मदत घ्यावी लागत होती. नव्या सुविधेमुळे हा सगळा त्रास कमी होईल आणि क्लेम सेटलमेंटचा वेळही घटेल.

दैनंदिन व्यवहारांप्रमाणे PF व्यवहार

आज सर्वसामान्य नागरिक एटीएम आणि यूपीआयचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. त्यामुळे ईपीएफ व्यवस्थेलाही या आधुनिक पद्धतींशी जोडण्याचा सरकारचा मानस आहे, असं मनसुख मांडवीय यांनी सांगितलं.

आधीच झालेले महत्त्वाचे बदल

ईपीएफओने याआधीही नियम सोपे केले आहेत. आता पीएफ क्लेम करताना चेक किंवा पासबुकच्या पहिल्या पानाचा फोटो अपलोड करण्याची गरज नाही. आधार ओटीपीद्वारे थेट पडताळणी केली जाते.

3 दिवसांत पैसे खात्यात

नव्या नियमांनुसार पीएफ क्लेम भरल्यानंतर साधारण तीन दिवसांत क्लेम मंजूर होतो आणि रक्कम थेट खातेदाराच्या नोंदणीकृत बँक खात्यात जमा केली जाते.

Next : "हात" सोडून "कमळ" हातात! काँग्रेसला धक्का देत भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रज्ञा सातव यांचा असा आहे राजकीय प्रवास! 

येथे क्लिक करा