IPS News : फलटणच्या तपासात धडाकेबाज IPS अधिकाऱ्याची एन्ट्री; CM फडणवीसांना आठवल्या साताऱ्याच्या माजी अधिक्षक

Rashmi Mane

फलटण महिला डॉक्टर केस

फलटण येथील महिला डॉक्टर डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या प्रकरणाचा तपास आता विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपविण्यात आला आहे.

IPS Tejaswi Satpute | Sarkarnama

तपासावर विशेष देखरेख

या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने व्हावा म्हणून राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. तपासावर देखरेख करण्याची जबाबदारी आयपीएस अधिकारी तेजस्वी सातपुते यांना देण्यात आली आहे.

IPS Tejaswi Satpute | Sarkarnama

तेजस्वी सातपुते कोण आहेत?

तेजस्वी सातपुते या 2012 बॅचच्या आयपीएस अधिकारी असून त्यांनी सातारा व सोलापूर जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक म्हणून काम केले आहे. सध्या त्या पुण्यात राज्य राखीव पोलिस बल क्रमांक 1 च्या समादेशक आहेत.

IPS Tejaswi Satpute | Sarkarnama

धडाकेबाज अधिकारी

तेजस्वी सातपुते या त्यांच्या धडाकेबाज अधिकारी म्हणून त्यांच्या कार्यशैलीसाठी ओळखल्या जातात. गुन्हेगारीवर नियंत्रण ठेवताना त्यांनी ‘ऑपरेशन परिवर्तन’ सारखी मोहिम राबवून अनेकांचे जीवन बदलले आहे.

IPS Tejaswi Satpute | Sarkarnama

तेजस्वींचा प्रवास प्रेरणादायी

शेवगाव या छोट्या गावातून आलेल्या तेजस्वी सातपुते यांच्या यशामागे त्यांची आईचा मोठा वाटा आहे. तेजस्वीनी या ‘टेडएक्स’ स्पीकर, लेखिका आणि कलाकारही आहेत.

IPS Tejaswi Satpute | Sarkarnama

सामाजिक बदलाची योद्धा

सोलापुरात एसपी असताना त्यांनी बंजारा समाजाला अवैध दारू व्यवसायातून बाहेर काढून त्यांना नवजीवन दिलं. हातभट्टींवर कारवाई करत समाजपरिवर्तन घडवणाऱ्या त्या धडाडीच्या अधिकारी ठरल्या आहेत.

IPS Tejaswi Satpute | Sarkarnama

आता सर्वांच्या नजरा तपासावर

या प्रकरणात पोलिस खात्यातीलच एक उपनिरीक्षक आरोपी असल्याने तपास अधिकच संवेदनशील झाला आहे. त्यामुळे तपास पूर्ण पारदर्शकतेने होणे गरजेचे आहे. फलटण प्रकरणातील सत्य बाहेर आणण्याचं मोठं आव्हान आता तेजस्वी सातपुते यांच्या समोर आहे.

Next : नात्यागोत्यात नसलेल्यांनाही मिळू शकते प्रॉपर्टी; गिफ्ट डीड’ म्हणजे काय अन् कसं करायचं? 

येथे क्लिक करा