Rashmi Mane
बक्षीसपत्र (Gift Deed) म्हणजे एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने आणि विनामूल्य दुसऱ्या व्यक्तीला जमीन किंवा मालमत्ता देण्यासाठी तयार केलेला कायदेशीर कागदपत्र आहे.
बक्षीसपत्राद्वारे मालकी हक्क (Ownership) एका व्यक्तीकडून दुसऱ्याकडे हस्तांतरित केला जातो. नोंदणीनंतर लाभार्थ्याला त्या मालमत्तेचा पूर्ण कायदेशीर हक्क मिळतो.
पूर्णपणे विनामूल्य (Without consideration)
प्रेम आणि आपुलकीच्या भावनेतून संपत्ती दिले जाते.
देणाऱ्याकडे संबंधित मालमत्तेचा पूर्ण हक्क असावा लागतो.
नोंदणी झाल्यानंतरच ते कायदेशीर ठरते.
देणारा (Donor) आणि स्वीकारणारा (Donee) दोघांचीही संमती असणे आवश्यक आहे.
देणाऱ्याने स्वेच्छेने बक्षीस पत्र द्यावे, त्यामध्ये कोणताही दबाव, फसवणूक किंवा सक्ती असू नये.
देणारी व्यक्ती मानसिकदृष्ट्या सक्षम असावी.
मालमत्ता वादमुक्त असावी.
अल्पवयीन व्यक्तीसाठी पालकांची संमती आवश्यक.
दोन साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्या असणे बंधनकारक.
बक्षीसपत्राचा मसुदा तयार करावा
दोन्ही पक्षांच्या आणि साक्षीदारांच्या स्वाक्षऱ्या घ्याव्यात
स्थानिक उपनोंदणी कार्यालयात जाऊन नोंदणी करावी
आवश्यक कागदपत्रे आणि स्टॅम्प ड्युटी भरावी
एकदा बक्षीसपत्र नोंदवले गेले की ते मागे घेता येत नाही. म्हणजेच, देणाऱ्याने दिलेली मालमत्ता परत मागवता येत नाही.
थोडक्यात सांगायचे झाल्यास बक्षीसपत्र हे विनामूल्य असते. फक्त नोंदणीकृत दस्तऐवजलाच कायदेशीर मान्यता मिळते. लाभार्थ्याला मिळतो पूर्ण मालकी हक्क. आणि नोंदणीनंतरच नाव सातबाऱ्यावर लावता येते. एकदा नोंदणी झाल्यावर बक्षीसपत्र रद्द करता येत नाही.