पंजाबच्या माजी उपमुख्यमंत्र्यांना वाचवणाऱ्या 'पीआय'ने ५ लाखांचं बक्षीसही नाकारलं, संतोष केंद्रेंचा इथपर्यंतचा सोपा नव्हता 'स्ट्रगल'

Deepak Kulkarni

उपमुख्यमंत्र्यांचा वाचवला जीव

पोलीस निरीक्षक (PI) संतोष वैजनाथ केंद्रे यांनी नांदेड येथे स्वत: च्या जीवाची बाजी लावत पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंग बादल यांचा प्राणघातक हल्ल्यातून जीव वाचवला.

PI Santosh Kendre | Sarkarnama

चर्चेचा आणि कौतुकाचा विषय

संतोष केंद्रे यांनी 13 ऑगस्ट 2026 रोजी नांदेड येथे सुखविंदरसिंग बादल यांच्या रक्षणासाठी स्वत:चा जीव धोक्यात घातला. यामुळे बादल थोडक्यात बचावले. मात्र,केंद्रे हे संपूर्ण देशभरात चर्चेचा आणि कौतुकाचा विषय ठरत आहे.

PI Santosh Kendre | Sarkarnama

5 लाखांची आर्थिक मदत

केंद्रे या धाडसाची दखल घेत बादल कुटुंबियांनी त्यांची हॉस्पिटलमध्ये जाऊन भेट घेतली. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करतानाच त्यांना बक्षीस म्हणून 5 लाखांची आर्थिक मदतही जाहीर केली.

PI Santosh Kendre | Sarkarnama

बक्षीस नाकारलं

पण याहीपुढे जाऊन केंद्रे यांनी बादल कुटुंबियांनी दिलेलं बक्षीस मी तर माझं कर्तव्य बजावलं सांगत विनम्रपणे नाकारलं, हीच त्यांची बाब नागरिकांना भावली आहे.

PI Santosh Kendre | Sarkarnama

वृद्धाकडून प्राणघातक हल्ला

नांदेड येथील पवित्र सचखंड गुरुद्वाराच्या दर्शनासाठी पंजाब राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंग बादल सहकुटुंब आले होते. याचदरम्यान, त्यांच्यावर एका 62 वर्षीय वृद्धाने प्राणघातक हल्ला केला. 

PI Santosh Kendre | Sarkarnama

संघर्षमय प्रवास

संतोष केंद्रे हे सध्या विशेष सुरक्षा दलात पोलीस निरीक्षक पदावर सेवेत आहेत. मात्र,त्यांचा इथपर्यंतचा प्रवास हा अतिशय खडतर आणि संघर्षमय राहिला आहे. ते मूळ लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील कुणकी गावचे रहिवासी आहेत. 

PI Santosh Kendre | Sarkarnama

2009 मध्ये PSI

हिंगोली येथे 2001 मध्ये संतोष केंद्रे पोलीस कर्मचारी (कॉन्स्टेबल) म्हणून रुजू झाले. यानंतर 2006 मध्ये त्यांनी MPSC परीक्षेतही यश मिळवलं. 2009 मध्ये त्यांची पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदी नियुक्ती करण्यात आली.

PI Santosh Kendre | Sarkarnama

पहिली पोस्टिंग

नाशिकमधील महाराष्ट्र पोलीस अकादमीत त्यांनी 2009-2010 मध्ये या कालावधीत आपलं प्रशिक्षण पूर्ण केलं. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना 2010 मध्ये PSI म्हणून नागपूर शहर पोलीस दलात पहिली पोस्टिंग मिळाली.. 

PI Santosh Kendre | Sarkarnama

विशेष सुरक्षा दलात कार्यरत

केंद्रे यांनी त्यानंतर 'फोर्स वन' या महाराष्ट्राच्या विशेष दलात मुंबईत रुजू झाले. 2023 मध्ये त्यांना प्रमोशन मिळालं. त्यांची पोलीस प्रशिक्षण केंद्रात पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली. यानंतर त्यांची नांदेड येथे बदली झाली. सध्या ते विशेष सुरक्षा दलात पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

PI Santosh Kendre | Sarkarnama

NEXT: मोदींच्या भाषणातून महाराष्ट्रासाठी 5 मोठे संदेश; तरुण, शेतकरी अन् उद्योगांना काय मिळणार?ेथे

PM Narendra Modi | Sarkarnama
येथे क्लिक करा...